Kashmira Police Station Arrested Illegal Bangladeshi Women : काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत शांतीपार्क मिरारोड पुर्व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईत एका बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आली आहे.
मिरा रोड :- काशिमिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शांतीपार्क परिसरात राहणाऱ्या एका बांगलादेशी महिलेला अटक करण्यात आली आहे. Kashmira Police Station Arrested Illegal Bangladeshi Women अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने ही धडक कारवाई केली असून ही महिला आधारकार्ड आणि पॅनकार्ड या बनावट कागदपत्राच्या आधारे मिरा रोड परिसरात वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, मिरा-भाईंदर यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, अनधिकृतपणे वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरीक काशिमिरा पोलीस ठाण्याचे हद्दीतील गाळा नं. 85 पुनम रेसिडेन्सी जवळ, शांतीपार्क मिरारोड पुर्व या ठिकाणी येणार असल्याची माहिती मिळाली असून ते समक्ष हजर राहुन दाखविणार आहे.
मिळालेल्या बातमीप्रमाणे कायदेशीर बाबींची पुर्तता करुन दुभाषीक व दोन पंचासमक्ष सापळा रचुन 1 महिला बांगलादेशी नागरीक हिला महिला पोलीसांच्या मदतीने ताब्यात घेवून तिचेकडे केलेल्या चौकशीत, ति स्वतः बांगलादेशी नागरीक असुन सुध्दा तिने खोट्या कागदपत्रांचे आधारे भारतीय आधारकार्ड व पॅनकार्ड बनवून त्याचा वापर केला आहे, ताब्यात घेण्यात आले असुन सदर बाबत दोन पंचासमक्ष पोलीस उपनिरीक्षक उमेश पाटील यांनी पंचनामा केला आहे.बांगलादेशी महिला हिच्या विरुध्द महिला पोलीस हवालदार अश्विनी भिलारे यांनी सरकार तर्फे फिर्याद दिल्याने काशिमीरा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318, 336 (2), 340 (2) सह पासपोर्ट (भारतात प्रवेश) अधिनियम 1920 चे कलम 3,4सह विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 13,14-अ (घ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, (गुन्हे) मि.भा.व. वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष मिरा-भाईंदर पथकाचे पोलीस निरीक्षक देविदास हंडोरे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश तुपलोंढे, उमेश पाटील, सहाय्यक फौजदार रामचंद्र पाटील, राजाराम आसावले, महिला पोलीस हवालदार निशीगंधा मांजरेकर, पोलीस हवालदार किशोर पाटील, चेतनसिंग राजपुत,केशव शिंदे, महिला पोलीस हवालदार अश्विनी भिलारे पोलीस हवालदार सम्राट गावडे यांनी केली आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…