Mira Road Crime News : नवऱ्याकडून बायको आणि दोन मुले हरवल्याची तक्रार, पोलिसांना हरवलेली मुले आणि बायको सापडली वाराणसीत!
•मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्षाची कामगिरी, हरविलेल्या बायको आणि मुलांना वाराणसीतून शोधून काढले
मिरा रोड :- मिथलेश जोगी चौधरी यांची पत्नी सुजाता मिथलेश चौधरी (40 वय), मुलगा अभिजीत मिथलेश चौधरी (20 वय) आणि आदित्य मिथलेश चौधरी (19 वय) हरवल्याची तक्रार काशिमिरा पोलीस ठाण्यात देण्यात आली होती. 5 ऑगस्ट 2024, रात्रीच्या दरम्यान पत्नी आणि दोन मुले कोणालाही काही न सांगता कुठेतरी निघून गेल्याची तक्रार मिथलेश चौधरी यांनी पोलीस ठाण्यात दिली होती.मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण पोलिसांनी अडीच महिने शोध घेवून चौधरी यांची पत्नी आणि दोन मुले यांचा शोध घेत असताना हे कुटुंबातील सदस्य वाराणसी मध्ये सापडले असल्याचे पोलिसांकडून सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 ऑगस्ट 2024 रोजी मिथिलेश चौधरी यांनी दिलेला तक्रारीवरून त्यांच्या कुटुंबातील म्हणजेच त्यांची पत्नी आणि दोन मुले हरवल्याची तक्रार दिली होती.तक्रारदार यांना त्याच्या पत्नी व मुलांचा अडीच महीन्यात काहीही संपर्क न झाल्याने त्यांचे कोणीतरी काहीतरी बरेवाईट केले असावे अशी भिती वाटू लागली होती. चौधरी यांनी गुन्हे शाखेशी संपर्क साधला. विषयाचे गांभीर्य लक्षात घेवून वरिष्ठांनी सुचना दिल्याप्रमाणे मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी राहुल राख यांनी पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे, पोलीस हवालदार हनुमंत सुर्यवंशी असे तपास पथक तयार केले.
पोलीस पथकाने मिसींगची काशिमीरा पोलीस ठाणेतून माहीती घेऊन त्यानुसार तांत्रिक व गोपनिय तपास करून मेहनत घेवून तपासात सातत्य ठेवून तिन्ही मिसींग व्यक्ती हे वाराणसी, उत्तरप्रदेश येथे असल्याची माहीती गुप्त बातमीदाराकडून तसेच तांत्रीक विश्लेषणावरून मिळाली होती. वरिष्ठांची परवानगीने पोलीस हवालदार हनुमंत सुरेश सूर्यवंशी यांना रवाना करण्यात आलेले होते. पोलीस हवालदार हनुमंत सुर्यवंशी यांनी तिन्ही मिसींग व्यक्तींना रामनगर पोलीस ठाणे, जिल्हा वाराणसी, उत्तरप्रदेश येथील पोलीसांच्या मदतीने शोध घेतला असता ते तिन्ही जण भिटी सुलतानपुर, रामनगर, वाराणसी, उत्तरप्रदेश येथे मिळून आले आहेत. ते का घर सोडून गेले, इतक्या दिवस कुठे होते, या सर्वांची चौकशी पोलिसांकडून केली जात आहे.
पोलीस पथक
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांचे मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल राख, पोलीस निरीक्षक धनंजय पोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय सरक, नितीन बेन्द्रे, पोलीस उपनिरीक्षक हितेन्द्र विचारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जेथे, मनोहर तावरे, आसीफ मुल्ला, पोलीस हवालदार हनुमंत सुर्यवंशी, संग्राम गायकवाड, शिवाजी पाटील, गोविंद केंद्रे, राजाराम काळे, संतोष मदने, सतिष जगताप, राजविर संधू, प्रविणराज पवार, महेश वेल्हे, अनिल नागरे, पोलीस शिपाई साकेत माघाडे अखिल सुतार, नितीन राठोड, अंगद मुळे, मसुब सचीन चौधरी, सफी. संतोष चव्हाण सर्व नेमणुक मध्यवती गुन्हे प्रकटीकरण शाखा यांनी यशस्वी कामगिरी केलेली आहे.