Mira Road Crime News : मीरारोडमध्ये हायप्रोफाईल रॅकेट उघड! – बांगलादेशी महिला दलालाकडून वेश्याव्यवसाय; दोन पीडित मुलींची सुटका

Mira Road Sex Racket News : व्हॉट्सॲपवर मुलींचे फोटो पाठवून सौदा; महिला अत्याचार प्रतिबंधक कक्षाच्या धडक कारवाईत सुलताना सैय्यदला अटक
मीरारोड :- मीरारोड परिसरात महिला अत्याचार प्रतिबंधक आणि विशेष बालकांचे संरक्षण व काळजी कक्षाने मोठी कारवाई करत एका बांगलादेशी महिला वेश्यादलालाच्या तावडीतून दोन पीडित मुलींची सुटका केली आहे. आरोपी महिला तिच्या राहत्या घरातूनच व्हॉट्सॲपच्या माध्यमातून हे अवैध रॅकेट चालवत असल्याचे उघड झाले आहे. Mira Road Latest Crime News
दिनांक 2 डिसेंबर रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सुलताना मोमोताज सैय्यद (वय 39, मूळ बांगलादेश, रा. गौरव वुड्स, मीरारोड) ही व्हॉट्सॲपद्वारे पुरुष ग्राहकांना मुलींचे फोटो पाठवून पैशाच्या बदल्यात वेश्यागमनासाठी मुली पुरवत होती. Mira Road Latest Sex Racket
पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मीरारोड येथील गौरव वुड्स फेज-1 मध्ये छापा टाकला. छाप्यादरम्यान सुलताना मोमोताज सैय्यद हिने दोन पीडित मुलींना वेश्यागमनासाठी प्रवृत्त केले असल्याचे निदर्शनास आले. तिच्याकडून वेश्यागमनाची रक्कम 12 हजार जप्त करण्यात आली असून, तिला तात्काळ ताब्यात घेण्यात आले आहे.
सुटका करण्यात आलेल्या दोन्ही पीडित मुलींना संरक्षणार्थ कांदिवली (प.), मुंबई येथील रेस्क्यू फाऊंडेशन येथे ठेवण्यात आले आहे. मीरारोड पोलीस ठाण्यात सुलताना मोमोताज सैय्यद आणि पाहिजे आरोपी भाग्यश्री लोहार उर्फ गुड्डी (रा. चेंबूर, मुंबई) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये (PITA) पुढील तपास सुरू आहे.



