Mira Road Latest Crime News : 72 वर्षांच्या महिलेला धक्का देत 2.5 लाखांची चैन चोरी 2 सराईत आरोपी जेरबंद; चोरीचा मुद्देमाल जप्त
मिरारोड | एकाच क्षणात सर्व काही बदललं… भक्ती वेदांत हॉस्पिटलबाहेर 72 वर्षीय वृद्धा पती आणि भाच्यासोबत चालत असताना, पाठिमागून वेगात आलेल्या मोटारसायकलवरील दोघांनी गळ्यातील 5 तोळ्यांची सुमारे 2.5 लाखांची सोन्याची चैन हिसकावली. झटका दिला आणि गर्दीचा फायदा घेत पसारही झाले. पण, गुन्हा घडल्यानंतर केवळ 12 तासांत गुन्हे शाखा कक्ष-1, काशिमीरा पोलिसांनी Kashmira Police Station ही चैनस्नॅचिंगची केस हॉलिवूड थ्रिलरप्रमाणे उकलली.
गुन्हा आणि पोलिसांची शिताफी
15 जुलै रोजी सकाळीच्या दरम्यान हि घटना घडली. वृद्ध महिला पोटदुखीच्या त्रासासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल होती. उपचार झाल्यानंतर बाहेर पडताच दोन अनोळखी तरुण मोटारसायकलवर आले आणि गळ्यातील चैन खेचण्याचा प्रयत्न केला. महिलांनी प्रतिकार केला, त्यामुळे आरोपींनी त्यांना धक्का दिला आणि चैन हिसकावून पसार झाले.या प्रकरणी काशिमीरा पोलीस ठाणे येथे BNS कलम 309(4), 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या आदेशावरून, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला सुरुवात झाली.काशिमीरा गुन्हे शाखा कक्ष-1 चे अधिकारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन सानप, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी सीसीटीव्ही फूटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त बातम्या यांच्या आधारे मुंबईहून जोधपूरला पळून जाणाऱ्या सूर्यनगरी एक्सप्रेसमध्ये आरोपींचा माग काढला आणि शिताफीने त्यांना अटक केली.
सराईत आरोपी आणि त्यांचा गुन्हेगारी इतिहास
आरोपी क्र. 1 – शहजाद इमाम मोहंमद आरीफ हैदरी ऊर्फ चिकी ऊर्फ गधीर अमरोही (वय 41), रा. अमरोहा, उत्तर प्रदेश
आरोपी क्र. 2 – अबू तोराब ताजदार हुसैन (वय 23), रा. ठाकूर व्हिलेज, कांदिवली (पू.)
या दोघांकडून चोरीस गेलेली 2 लाख 90 हजार 750 किंमतीची सोन्याची चैन आणि मोबाईल फोन हस्तगत करण्यात आला. शहजाद हा याआधीही चैनस्नॅचिंग प्रकरणांमध्ये दोषी ठरलेला आणि शिक्षा भोगलेला सराईत गुन्हेगार आहे.शहजाद इमाम मोहंमद आरीफ हैदरी ऊर्फ विकी ऊर्फ गधीर अमरोही याच्या विरोधात तब्बल 19 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…