• प्रेमाचा भीषण शेवट; आरोपी प्रियकर अवघ्या 24 तासांत अटकेत
मिरारोड | प्रेमाच्या नात्याने सुरू झालेली गोष्ट थेट हत्या आणि रक्तपातापर्यंत गेली! मिरारोड पूर्व येथील म्हाडा कॉलनीमध्ये राहणाऱ्या तरुणीचा तिच्याच प्रियकराने गळा चिरून खून केल्याची थरारक घटना समोर आली आहे. लग्नास नकार दिल्याने संतप्त झालेल्या प्रियकराने रागाच्या भरात हे पाऊल उचलले.
करीना खुर्शीद अली उर्फ सनाबानो (वय 24) आणि समशुद्दीन मोहम्मद हाफीज यांच्यात गेल्या वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. दोघेही पिनाकोला एन.एक्स. येथील रुम नं. 602 मध्ये एकत्र राहत होते. समशुद्दीन करीनाशी लग्न करण्याच्या मागे लागला होता. मात्र, करीना त्याला वारंवार चकवू लागली. ‘सध्या पैसे कमवते, मग पाहू’ असं सांगत ती लग्न टाळत होती.
त्याचवेळी करीनाचे इतर कुणाशीतरी संबंध असल्याचा संशय समशुद्दीनला होता. यामुळे दोघांमध्ये नेहमीच वादविवाद होत. अखेर 12 जून रोजी रात्री वाद पुन्हा शिगेला पोहोचला. करीनाने त्याला ‘गावाला जा’ असं फटकावून सांगितलं आणि नेमकी हीच गोष्ट तिच्या मृत्यूचं कारण ठरली. संतप्त समशुद्दीनने चाकूने तिच्या गळ्यावर सपासप वार करत तिला जागीच ठार मारलं आणि तेथून पसार झाला.
घटनेची माहिती मिळताच मिरारोड पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. तपास सुरू करताच गुन्हा नुसार भारतीय न्याय संहिता कलम 103(1) अन्वये खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
या गंभीर घटनेचा तपास करण्यासाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष सांगवीकर, प्रविण भोसले, रामेश्वर पडवळ यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष तपास पथक तयार करण्यात आले. तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि इतर गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा मागोवा घेतला.
अखेर आरोपी एल.आर. तिवारी कॉलेजजवळ पळून जाण्याच्या तयारीत असताना पोलिसांच्या सापळ्यात सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या तो पोलीस कोठडीत असून अधिक तपास सुरु आहे.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…