क्राईम न्यूज

Mira Road Crime News : गावठी कट्टा विकायला आणला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला..

Mira Road Police Arrested Criminal With Gavthi Katta : गुन्हे प्रकटीकरण विभागाची कारवाई ; मित्राला गावठी कट्टा विकण्यासाठी आलेल्या मित्र पोलिसांच्या ताब्यात, गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे जप्त

मिरा रोड :- गावठी कट्टा Gavthi Katta आणि जिवंत काडतुसे मित्राला विक्रीसाठी आणलेल्या पोलिसांनी Mira Road Police एका गुन्हेगाराला अटक केली आहे. उत्तर प्रदेश मधून गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे विक्रीसाठी आलेल्या आरोपीला गुन्हे प्रकटीकरण विभागाने हॉटेल फाउंटन,घोडबंदर रोड मुंबई-अहमदाबाद हायवे येथून ताब्यात घेतले आहे.

गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे विक्रीसाठी एक व्यक्ती येणार असल्याची माहिती काशिगांव पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई मंगेश रक्षे यांना मिळाली होती. मंगेश रक्षे यांनी मिळालेल्या माहितीच्या बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुलकुमार पाटील यांना सांगितले. पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण, शाखेने सापळा रचून. हॉटेल फाउंटन समोर मुंबईकडे जाणाऱ्या बस स्टॉप परिसरातून शिवकुमार जयराम पासवान (रा. फतेपुर, उत्तर प्रदेश) त्याला ताब्यात घेतले. Mira Road Latest Crime News

पोलिसांनी त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि जिवंत काडतुसे जप्त केले आहे.आरोपीच्या विरोधात काशीगांव पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायदा सन 1959 चे कलम 3,25,7 तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा अधिनियम 37(3),135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला 06 ऑगस्टपर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.चौकशी दरम्यान आरोपीने गावठी कट्टा आणि बंदूक त्याचा मित्र अंकित याला विक्री करण्यासाठी आल्याचे सांगितले आहे. गावठी कट्टा कुठून आणला? कोणाची हत्या करण्यासाठी आणला होता का? याची सखोल चौकशी पोलीस उपनिरीक्षक अभिजीत लांडे हे करत आहे. Mira Road Latest Crime News

पोलीस पथक

प्रकाश गायकवाड, पोलिस उप आयुक्त परिमंडळ 01, डॉ विजय मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग, राहुलकुमार पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, काशिगांव पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली काशिगांव पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे. Mira Road Latest Crime News

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0