वर्क फ्रॉम होमच्या नावाने फसवणूक ; फसवणुकीतील पैसे तक्रारदार याला परत करण्यास सायबर पोलिसांनी यश
Kashigaon Police News : काशिगांव पोलीस ठाण्यास यश ; वर्क फ्रॉम होम Work From Home Fraud नावाखाली ऑनलाईन यु टुब व्हिडीओ लाईक स्टारक, ऑनलाईन हॉटेल /मुव्ही रेटींगमध्ये गुतंवणुक करण्यास सांगुन केलेल्या फसवणुकीतील संपूर्ण रक्कम 5 लाख 30 हजार रुपये पैकी 4 लाख 40 हजार रुपये तक्रारदार यांना परत Mira Road Fraud News
मिरा रोड :- वर्क फ्रॉम होम Work From Home च्या नावाखाली फसवणूक झाल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहे. वेगवेगळ्या ॲपला रिव्ह्यू आणि स्टार देण्याच्या पाहण्याने लाखोचे रुपये फायदा दाखवण्याचा अमित दाखवून मोठ्या प्रमाणावर फसवणूक होणारी घटना घडत असते अशीच एक घटना मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिगांव पोलीस स्टेशन परीसरात राहणारे कुणाल महेद्रा सिंग, (32 वर्ष) ( रा. मिरारोड पूर्व) वर्क फ्रॉम होम नावाखाली ऑनलाईन यु दुब व्हीडीओ लाईक स्टास्क, ऑनलाईन हॉटेल / मुव्ही रेटींग यांना लाईक अथवा गुंतवणुक केल्यास अधिक नफा मिळविण्याचे आमिष दाखवुन साक्षीदार यांना 5 लाख 50 हजार रुपयाची फसवणुक झाली होती. सदर फसवणुकीच्या अनुषंगाने काशिमीरा पोलीस स्टेशन येथे भादंवीसे कलम 420,34सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (सी), 66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. Mira Road Fraud News
तक्रारी बाबत तात्काळ गुन्हा दाखल करून घेवून तक्रारदार यांचे झाले व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली. प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांची रक्कम वेगवेगळ्या बैंक खात्यात वळती झाल्याचे दिसुन आले. त्या अनुषंगाने तक्रारदार यांची रक्कम गोठविण्याबाबत संबंधीत बैंकेसोबत पत्रव्यवहार करुन संशयीत खात्यामध्ये रक्कम मोठविण्यात आली. त्यानंतर न्यायालयाकडुन तक्रारदार यांची रक्कम परत मिळवण्याकरिता काशिमीरा पोलीस ठाणेचे अधिकारी/अंमलदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने साक्षीदार कुणाल सिंग यांची फसवणुक झालेली 5 लाख 50 हजार रुपये रक्कमेपैकी 4 लाख 40 हजार रुपये त्यांचे खात्यावर परत मिळविण्यात आली आहे. Mira Road Fraud News
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परि 01. मिरा रोड, विजय कुमार मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली राहुलकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे, पोलीस हवालदार सचिन पाटील यांनी पार पाडली आहे.
नागरीकांना आवाहन
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्या सोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर गुन्हे कक्षास संपर्क साधावा, तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी.