•सायबर पोलिसांचे उत्कृष्ट कामगिरी ; शेअर मार्केटच्या नावाखाली तब्बल 15.20 लाखांची फसवणूक!
मिरा रोड :- शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग खाते उघडून पैसे गुंतविल्यास कमी दिवसांत चांगला परतावा मिळेल, असे आमिष सायबर गुन्हेगारांकडून लोकांना दाखविले जात आहे. सुरवातीला थोड्या रकमेचा परतावा लगेचच दिला जातो, जेणेकरून समोरील व्यक्ती विश्वास ठेवून जास्त पैसे गुंतविण्यास तयार होईल.मात्र, मोठी रक्कम हाती लागल्यानंतर सायबर गुन्हेगार ना मुद्दल ना जादा परतावा देतात अशी वस्तुस्थिती आहे. अशीच रक्कम फसवणूक झालेल्या मिरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पंगम यांनी सायबर विभागाच्या NCCRP Portal येथे 15.20 लाखांची फसवणूकी बाबत तक्रार दाखल केली होती.तक्रारीनंतर सायबर विभागाच्या पोलिसांनी त्वरित ती रक्कम परत मिळवून देण्यास यश आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील मिरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणार आहे पंगम यांना मोबाईलवर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याबाबत एक कॉल आला होता. शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग केल्यास मोठ्या प्रमाणावर आर्थिक नफा मिळेल या आमिषाला बळी पडत पंगम यांनी त्या आर्थिक गुंतवणूक केली होती. परंतु गुंतवणूक केलेल्या रक्कमेपैकी कोणत्याही प्रकारे परतावा न मिळाल्याने आपली आर्थिक फसवणूक झाली असे लक्षात येतात बुरमान यांनी सायबर पोलिसांच्या NCCRP Portal वर तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारदार यांनी वेळोवेळी केलेले आर्थिक व्यवहाराची तपासणी करून सर्व रक्कम पोलिसांना गोठाविण्यात आली. पोलिसांनी बँकेची आणि न्यायालयाची पत्रव्यवहार करून फसवणुकीतील रक्कम बुरमान यांच्या मूळ खात्यावर परत मिळवून देण्यात यश आले आहे. पोलिसांना फसवणुकीतील 15 लाख 20 हजार रुपयांची रक्कम पंगम यांच्या खात्यात परत मिळवून देण्यास यश आले आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय पांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी सायबर पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर यांचेसह सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार स्नेहल पूणे, पोलीस अंमलदार कुणाल सावळे, शुभम कोवळे, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे सायबर पोलीस ठाणे यांनी पार पाडली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…