Mira Road Crime News Work From Home Scam काशिगांव पोलीस ठाण्यास यश ; वर्क फ्रॉम होम नावाखाली ऑनलाईन यु टुब व्हिडीओ लाईक टास्क ऑनलाईन हॉटेल/मुव्ही रेटींगमध्ये गुतंवणुक करण्यास सांगुन केलेल्या फसवणुकितील संपुर्ण रक्कम 3 लाख 45 हजार रुपये तक्रारदार यांना परत
मिरा रोड :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील काशिगांव पोलीस ठाणे परिसरात राहणारे रिशु जयस्वाल, (30 वर्षे) (रा. मिरारोड पूर्व) Mira Road Crime News वर्क फ्रॉम होम नावाखाली ऑनलाईन युटुब व्हीडीओ लाईक टास्क, ऑनलाईन हॉटेल/मुव्ही रेटींग यांना लाईक अथवा गुंतवणूक केल्यास अधिक नफा मिळविण्याचे आमिष दाखवुन साक्षीदार यांना 3 लाख 45 हजार रुपयाची फसवणुक झाली होती. सदर फसवणुकिच्या अनुषंगाने काशिमीरा पोलीस ठाणे येथे गुन्हा भादवि कलम 420,34 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 66 (सी), 66 (डी) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
नमुदत तक्रारी बाबत तात्काळ गुन्हा दाखल करुन घेवून तक्रारदार यांचे झाले व्यवहाराबाबत माहिती प्राप्त करण्यात आली. प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता तक्रारदार यांची रक्कम वेगवेगळ्या बैंक खात्यात वळती झाल्याचे दिसून आले. त्याअनुषंगाने तक्रारदार यांची रक्कम गोठविण्याबाबत संबंधीत बँकेसोबत पत्रव्यवहार करुन संशयीत खात्यामध्ये रक्कम गोठविण्यात आली. त्यानंतर न्यायालयाकडुन Mira Road Crime News तक्रारदार यांची रक्कम परत मिळविण्या करीता काशिमीरा पोलीस ठाणेचे अधिकारी अंमलदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने साक्षीदार यांची फसवणुक झालेली संपूर्ण रक्कम 3 लाख 45 हजार रुपये त्यांचे खात्यावर परत मिळविण्यात आली आहे.
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 01, मिरारोड, विजय कुमार मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांचे मार्गदर्शनाखाली राहुलकुमार पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक राहुल सोनवणे, पोलीस हवालदार सचिन पाटील यांनी पार पाडली आहे. Mira Road Crime News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…