Mira Road Crime News : सायबर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी, ऑनलाइन फ्रॉड मधील पैसे परत करण्यास पोलिसांना यश
Mira Road Crime News सायबर पोलीस ठाण्यास यश ; NCCRP portal वर दाखल तक्रारीमध्ये संबंधीतांना पाठपुरावा करुन तक्रारदार यांची फसवणुक झालेली रक्कम परत
मिरा रोड :- NCCRP सायबर विभागाच्या या पोर्टलवर आलेल्या तक्रारीवरून त्वरित कारवाई करत तीन तक्रारदारांचे पैसे परत करण्यास सायबर पोलिसांना यश आले आहे.मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील सायबर पोलीस ठाणे येथे ऑनलाईन तक्रारीकरीता NCCRP portal कार्यरत आहे. सायबर पोलीस ठाणे मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील 18 पोलीस ठाण्यात NCCRP portal चे नोडल ऑफिसर म्हणून कामकाज पाहते. खालील नमुद तक्रारदार यांनी त्यांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्याबाबत ऑनलाईन तक्रार नोंदविली होती.
सायबर पोलीस ठाणे यांनी त्यांचे NCCRP portal तक्रारीचे अवलोकन करुन संबंधीत बैंक पेमेंट मर्चट यांचेशी तात्काळ पुढील पत्रव्यवहार करून तक्रारदार यांची रक्कम त्यांचे मूळ खात्यात जमा होणेबाबत पाठपुरावा केला. त्या अनुषंगाने सायबर पोलीस ठाणे यांचेकडून एकूण 1 लाख 53 हजार 180 रक्कम 03 तक्रारदार यांचे मुळ खात्यावर परत मिळविण्यात आलेली आहे.
तीन तक्रारदारांचे पैसे परत करण्यात पोलीसांना यश
NCCRP portal तक्रारदार
1.अभिनय यांची परत केलेली रक्कम 1 लाख/-रु.
2.NCCRP portal तक्रारदार तनिष यांची परत केलेली रक्कम 930 रु.
3.NCCRP portal तक्रारदार अभिषेक यांची परत केलेली रक्कम 52 हजार 250 रु.
पोलीस पथक
अविनाश अंबूरे Avinash Ambure पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे, महिला पोलीस अंमलदार अमिना पठाण, महिला पोलीस अंमलदार सुवर्णा माळी, पोलीस अंमलदार राहुल बन, महिला पोलीस अंमलदार स्नेहल पुणे, महिला पोलीस अंमलदार चैताली सानप, पोलीस अंमलदार शुभम कांबळे यांनी पार पाडली आहे.
नागरीकांना आवाहन
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारे फसवणूक करणे कायदयाने गुन्हा आहे. असा प्रकार आपल्यासोबत घडला असल्यास तात्काळ नजीकच्या पोलीस ठाणेस संपर्क साधावा, तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधून तक्रार द्यावी.
फसवणूक टाळण्यासाठी यावयाची काळजी…
ऑनलाईन व्यवहार करीत असताना अगर इतर खात्यात रक्कम वर्ग करीत असताना बैंक खात्याची खात्री केल्याशिवाय व्यवहार करु नये. बैंक/ क्रेडीट कार्ड बैंक कोणत्याही प्रकारे ग्राहकांना एसएमएस किंवा फोनवर संपर्क साधून वैयक्तिक गोपनीय माहिती विचारणा करत नाही. अनोळखी मोबाईल धारकांना आपली वैयक्तिक माहिती / आर्थिक व्यवहारासंबंधीत माहिती उघड करु नये. आपले बैंक खाते, जन्मदिनांक OTP वा इतर वैयक्तीक माहीती उघड करू नये. अनोळखी लिंक, ॲप्लीकेशन डाऊनलोड करु नये. ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 तसेच www.cybercrime.gov.in वर संपर्क करुन आपली तक्रार नोंदवावी. ऑनलाईन फसवणूक झाल्यास तात्काळ बैंकेला संपर्क करावा.