क्राईम न्यूजमुंबई
Trending

Mira Road Crime News : कारची काच फोडून लॅपटॉप आणि कारटेप चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक

Mira Road Car Robbery News : दिवसाढवळ्या कारच्या काच फोडून लॅपटॉप आणि कार टेप चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात गुन्हे शाखा कक्ष-1 काशिमीरा यांना यश आले आहे

मिरा रोड :- कारची काच फोडून लॅपटॉप, कार टेप आणि मौल्यवान वस्तू चोरी झाल्याची घटना दिवसेंदिवस वाढत असल्याची पाहायला मिळत आहे. काशिगाव परिसरातील एलारा बिल्डिंग मधील दुकानाच्या समोर उभी केलेल्या कार मधून दिवसाढवळ्या लॅपटॉप चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला गुन्हे शाखा कक्ष-1 Mira Road Crime Branch Unit 1 पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याने 6 फेब्रुवारी 2025 च्या रोजी हे कृत्य केल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. Mira Road Latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 6 फेब्रुवारी दुपारच्या दरम्यान एलार बिल्डिंग समोरील दुकानाजवळ हरजत कन्हैया सिंग यांनी कार पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने कारच्या डाव्या बाजूच्या दरवाज्याचे काच फोडून सीटवर ठेवलेले लॅपटॉप, कॅमेरा,लेन्स असा सुमारे 39 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला होता. या घटनेबाबत काशिगाव पोलीस ठाण्यात फिर्यादी दाखल केली होती. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात बीएनएस कलम 303(2),324(2) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी गुन्ह्याचे उकल आणि गुन्हे अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेच्या नुसार गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा कक्ष-1 काशिमीरा यांनाही देण्यात आला होता.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून आरोपी हा मुंबईच्या कप परेड येथे राहत असल्याचे माहिती मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून आरोपी विनोद उर्फ लंगडा अशोक पवार (48‌ वय) यांस मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून त्याकडे प्राथमिक तपास करत असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.विनोद ऊर्फ लंगडा अशोक पवार याचा गुन्हेगारी पडताळून पाहता त्याचेवर मुंबई, ठाणे, नवि मुंबई, पुणे परिसरात 20 पेक्षा जास्त गुन्हे नोंद आहेत.

पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त,दत्तात्रय शिदे, अपर पोलीस आयुक्त,अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त गुन्हे, मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-1, काशिमीरा येथील पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, संदीप शिंदे, सहाय्यक फौजदार अशोक पाटील, संजय शिदे, पुष्पेंद्र थापा, पोलीस हवालदार सचिन हुले, अश्विन पाटील पोलीस शिपाई गौरव बारी, सौरभ इंगळे, धिरज मेंगाणे,सचिन चौधरी तसेच सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण सायबर गुन्हे शाखा यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0