Mira Road Crime News : काशिमिरा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई ; बेकायदेशीर रित्या अमली पदार्थ बाळगणाऱ्या दोन आरोपींना अटक
80 हजार किंमतीचा 4 किलो गांजा नावाचा अंमली पदार्थ पकडण्यास काशिमिरा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकास यश
मिरा रोड :- देशात लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सार्वत्रिक निवडणुका शांततेत व्हावे यासाठी प्रत्येक पोलीस आयुक्तांनी खबरदारी म्हणून शहरांमध्ये शांतता व सुव्यवस्था आणि बेकायदेशीर रित्या धंद्यांवर आळा घालण्याकरिता प्रयत्नशील आहे.मिरा भाईदर वसई विरार पोलीस आयुक्तालय परिसरात अंमली पदार्थ विक्री करणारे तसेच बाळगणारे व्यक्तींचा शोध घेवुन त्यांचेविरूध्द कारवाई करणेबाबत वरीष्ठांनी वेळोवेळी सुचना दिलेल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग यांनी दिलेल्या सुचना व मार्गदर्शनाप्रमाणे काशिमिरा पोलीस ठाणे हद्दीत गुन्हेगार वॉच पेट्रोलिंग फिरत असताना मुंबई अहमदाबाद महामार्गालगत मुंबईकडे जाणारे वाहिनीवर मन ओपस बिल्डिंग जवळील पडक्या घराजवळ काशिमिरा येथे 1) पारस धिरूभाई चावडा, (30 वर्षे) रा.जिल्हा सुरत गुजरात 2) पुष्पक महेंद्रसिंग चौहान, (28 वर्षे) रा. जिल्हा सुरत, गुजरात हे इसम संशयास्पद रित्या वावरत असताना मिळून आले त्यांचे ताब्यात मिळून आलेल्या बॅगची दोन पंचासमक्ष झडती घेता त्यांचे ताब्यात 04 किलो वजनाचा 80 हजार रू किंमतीचा गांजा हा अंमली पदार्थ व दोन मोबाईल असा एकुण 1 लाख 5 हजार रू किंमतीचा मुद्देमाल मिळून आला असून तो जप्त करण्यात आला आहे. Mira Road Crime News
नमुद आरोपी विरोधात काशिमिरा पोलीस ठाणे येथे एन.डी.पी.एस 1985 चे कलम 8 (क), 20 (ब), 29 दाखल करुन त्यांना गुन्हयात अटक करण्यात आली असून सदर गुन्हयाचा तपास पोउपनिरी शिवाजी खाडे नेम काशिमिरा पोलीस ठाणे हे करीत आहेत. Mira Road Crime News
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ-1), डॉ. विजय मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, (मिरारोड विभाग), वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक समीर शेख (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवाजी खाडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पवार, इगवे, पोलीस हवालदार मोहिले, पोलीस हवालदार सोनकांबळे, निलेश शिंदे, सतिश निकम, पोलीस अंमलदार रविंद्र कांबळे, राजेंद्र सुर्यवंशी यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे. Mira Road Crime News