Mira Road Cyber Fraud News : सायबर पोलिसांची यशस्वी कामगिरी ; क्रेडिट कार्ड द्वारे ऑनलाइन फसवून झालेले रक्कम परत मिळवून देण्यास सायबर विभागाला यश
मिरा रोड :- ऑनलाइन फसवणुकीच्या (Online Fraud) घटना सातत्याने वाढत आहेत. सायबर विभागाकडून ऑनलाइन (Cyber Crime Department) फसवणुकीसाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर आवाहन करण्यात येतं आहेत. तरीही काही नागरिकांचे कळत नकळतपणे ऑनलाईन फसवणूक झाल्याचे घटना समोर येतच असतात. ऑनलाइन फसवणुकीमध्ये क्रेडिट कार्डद्वारे मोठ्या प्रमाणावर फसवणूक होत असते असे पोलिसांच्या अहवालातून समोर आले आहे. अशीच एक घटना मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राहणाऱ्या गुप्ता यांच्यासोबत (Mira Road Police) घडली आहे. गुप्ता यांनी क्रेडिट कार्डचे बिल भरण्याची दिनांक बदलण्याकरिता हेल्पलाइन नंबर वर कॉल केला. त्यानंतर त्यांना एक लिंक खाली क्रेडिट कार्ड संदर्भात डिटेल भरण्यास सांगितले डिटेल भरल्यानंतर त्यांच्या क्रेडिट कार्ड मधील 71998 चे रक्कम कट झाले होते. आपली आर्थिक फसवणूक झाली आहे लक्षात येताच त्यांनी सायबर विभागाच्या पोलिसांना या संदर्भात तक्रार केली. Mira Road Cyber Fraud News
सायबर विभागाची कामगिरी
गुप्ता यांनी सायबर विभागाला केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी त्यांच्या व्यवहारात संदर्भात त सर्व माहिती गोळा केली. तसेच संबंधित बँकेला पत्रव्यवहार करून जी रक्कम कट करण्यात आली आहे ती रक्कम गोठविण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर पत्रव्यवहार करून संपूर्ण रक्कम ही खातेदाराच्या खात्यावर जमा झाली. सायबर पोलिसांनी मूळ खातेधारकाच्या खात्यावरून कट झालेली रक्कम 71,998 परत मिळवून देण्यास यश आले आहे. Mira Road Cyber Fraud News
सायबर विभागाचे पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस अंमलदार सचिन सुवर्णा माळी, पोलीस अंमलदार राहुल बन, विलास खाटीक, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे यांनी पार पाडली आहे. Mira Road Cyber Fraud News
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…