Mira Road Crime News : Credit card वरुन ऑनलाईन फसवणूक ; तक्रारदार महिलेचे 98 हजार परत करण्यात सायबर पोलिसांना यश
•Mira Road Crime News क्रेडिट कार्डच्या माध्यमातून चोरट्यांचा डल्ला, सायबर पोलिसांची विशेष कामगिरी ऑनलाइन फसवणूक झालेले पैसे परत देण्यास यश
मिरा रोड :- क्रेडिट कार्डची वैयक्तिक माहिती संकलित करून फसवणूक झाल्याची घटना मिरा-भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या हद्दीत घडली होती. क्रेडिट कार्डद्वारे महिलेची 98 हजार 940 रुपयाची फसवणूक झाल्याची तक्रार कोमेंट यांनी सायबर विभागाला तक्रार दिली होती. त्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली होती.
पोलीस उप आयुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्तालयाच्या सायबर विभागाने त्वरित महिलेची तक्रार करून त्या महिलेची ज्या खात्यावर पैसे गेले होतं ते रक्कम तात्काळ गोठवून खात्यात वर्ग करण्याकरिता पत्रव्यवहार केले त्या अनुषंगाने महिलेचे 98 हजार 940 रुपये मूळ खात्यावर मिळवून देण्यास पोलिसांना यश आले आहे. पोलीस निरीक्षक सुजित कुमार गुंजकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, महिला पोलीस हवालदार माधुरी धिंडे, अमिना पठाण, सुवर्णा माळी, पोलीस अंमलदार राहुल बन, महिला पोलीस अंमलदार स्नेहल पुणे, जयवंती वसावे पोलीस अंमलदार ओमकार खाटीक या सायबर विभागाच्या पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत महिलेचे फसवणूक झालेले पैसे परत मिळवून देण्यास यशस्वी कामगिरी केली आहे.