Mira Road Crime News : ‘ऑर्केस्ट्रा बार’च्या नावाखाली छमछम ; अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध पोलिसांची कारवाई

•Mumbai Police Busted Dance Bar पोलीस पथकाने बारमध्ये छापा मारला तेव्हा ऑर्केस्ट्राच्या नावाखाली बारबाला नृत्य करत होत्या. दहा जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात
मिरा रोड :- डान्स बार हद्दपार झाल्याचे दावे करण्यात येत असले तरी, खुलेआम सुरू असलेल्या ‘ऑर्केस्ट्रा बार’च्या नावाखाली शहरात अजूनही ‘छमछम’ सुरू असल्याचे अनैतिक मानवी वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईतून उघड झाले आहे. या शाखेच्या पथकाने वसानी पेट्रोलपंपाजवळ, मुंबई-अहमदाबाद महामार्ग, येथे असलेल्या बारमध्ये छापे टाकत बारबालांसह एकूण 10 जणांवर कारवाई केली.

शुक्रवारी मध्यरात्री मेला (श्री निधी इंटरप्रायजेस) ऑर्केस्ट्रा बार वर छापा घातला.पोलीस पथक बारमध्ये आले तेव्हा ऑर्केस्ट्राच्या नावाखाली बारबाला नृत्य करत होत्या. सोबत त्यांचे अश्लील हावभाव सुरू होते. तीन बारबाला स्टेजवर नृत्य करत होत्या बारबाला बारच्या चोरकप्प्यांमध्ये दडून होत्या.
ऑर्केस्ट्रा बारचे मॅनेजर, कॅशियर, स्टीवर्ड, वेटर व पुरुष सिंगर/वादक हे बारमधील महिला सिंगर यांना नृत्य करण्यास बंदी असताना नृत्य करण्यास भाग पाडुन प्रोत्साहित करीत असताना, मिळून आल्याने चित्रीकरण केलेली क्लीप एका पेन ड्राईव्हमध्ये घेवून कॅश काऊन्टरची रोख रक्कम 8 हजार 820 रु जप्त करुन नमुद ऑर्केस्ट्रा बार आस्थापनेचे मॅनेजर-2, कॅशिअर-1, स्टीवर्ड-2, वेटर-4 च पुरुष सिंगर/वादक-1 असे एकुण 10 जणांना ताब्यात घेण्यात आले.
ऑर्केस्ट्रा बारचे मालक पाहिजे आरोपी आणि तपासात निष्पन्न होणारे इतर चालक त्यांच्याविरुध्द पोलीस हवालदार केशव शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन काशिमिरा पोलीस ठाण्यात महाराष्ट्र हॉटेल, उपगृहे आणि मद्यपान कक्ष (बाररुम) यामधील नृत्य व अश्लिल नृत्यावर प्रतिबंध घालण्याबाबत व (त्यामध्ये काम करणा-या) महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण करण्याबाबत अधिनियम-2016 चे कलम 3,8(1) (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस पथक
अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, (गुन्हे) मि.भा.व. वि. पोलीस आयुक्तालय यांचे मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष मिरा-भाईंदर पथकाचे पोनि/देविदास हंडोरे, पोउपनिरी/उमेश पाटील, पोउपनिरी/अनिल पवार, सफौ/ रामचंद्र पाटील, पोहवा/केशव शिदे, व मपोहया/अश्विनी भिलारे यांनी केली आहे.