Mira Road Crime News : बेकायदेशीर घुसखोरी करून वास्तव्य करणार्या 5 बांगलादेशी महिलांना मिरा रोडमधून अटक
•मिरा रोड आणि नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदेशीर रित्या वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी महिलांना अनैतिक मानवी प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे.
मिरा रोड :- मिरा रोड मध्ये बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशींवर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष भाईंदर यांच्याकडून मोठी कारवाई करण्यात आलीय. मिरा रोड आणि नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाच बांगलादेशी महिला बेकायदेशीर वास्तव्य करत होत्या. या महिलांवर गुन्हा दाखल करत त्यांना अटक करण्यात आलीय.
मिरा रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महादेव कॉम्प्लेक्स समोर असलेल्या रामदेव पार्क तसेच नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मिरा रोड रेल्वे स्थानका जवळ ओव्हर ब्रीज जवळील एका इमारतीमध्ये कामासाठी येणार असून बांगलादेशी महिला पासपोर्ट आणि व्हिसाशिवाय वास्तव्यास असल्याची माहिती पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाला मिळाली होती. पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले आहे.त्यांची चौकशी केली असता त्या मूळच्या बांगलादेशी असून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करताच त्या भारतात आल्याचं निष्पन्न झालं. याप्रकरणी नयानगर पोलीस ठाण्यात तीन आणि मिरारोड पोलीस ठाण्यात दोन जणींविरोधात पासपोर्ट (भारतात प्रवेश) अधिनियम 1920 चे कलम 3, 4 सह विदेशी व्यक्ती अधिनियम 1946 चे कलम 13,14-अ (ब) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.