क्राईम न्यूज

Mira Road Crime News : 40 लाखांच्या तिजोरी चोरीचा उलगडा! मिरारोडच्या ‘ड्रिमलॅंड पार्क’मधून चोरी; राजस्थानसह मुंबईत सापळा रचून अटक

Mira Road Kashmira Police News : काशिमीरा पोलिसांची शाबासकी; दोन आरोपी जेरबंद, मुद्देमालासह गाडी आणि कटरही हस्तगत

मिरा रोड | मिरारोडमधील ‘ड्रिमलँड पार्क’ परिसरातील फ्लॅटमधून 40 लाखांहून अधिक किमतीचे सोनं-हिऱ्याचे दागिने आणि तिजोरी चोरीप्रकरणी काशिमीरा पोलिसांनी Mira Road Kashmira Police News दोन चोरट्यांना अटक करून मोठ्या मुद्देमालासह कारवाई केली आहे. या आरोपींकडून तब्बल 40 लाख 01 हजार 588 किंमतीचा ऐवज हस्तगत करण्यात आला असून, यात तिजोरी, कार आणि कटर मशीनचाही समावेश आहे. Mira Road Latest News

ही चोरी 15 जून ते 21 जून 2025 या कालावधीत झाली होती. फिर्यादी नुतन धीर (वय 60) या आपल्या मिरारोड येथील घरात नसताना, त्यांच्या बेडरूममधील गोदरेज तिजोरी अज्ञात व्यक्तींनी फोडून नेली. तिजोरीत 428.674 ग्रॅम वजनाचे सोनं आणि हिऱ्याचे दागिने होते, ज्याची अंदाजित किंमत 40 लाख 2 हजार 740 रुपये इतकी होती.

या गुन्ह्याचा तपास करत असताना काशिमीरा पोलिसांनी कौशल्यपूर्वक सापळा रचून कैलास भगराज पटेल (वय 22,रा. राजस्थान) आणि मयूर रल्हाण (वय 34,रा. मिरारोड) यांना कांदिवली, मुंबई येथून अटक केली. त्यांच्याकडून चोरीचा मुख्य मुद्देमाल तसेच पाच लाखांची कार आणि तिजोरी कापण्यासाठी वापरलेले कटर मशीनही जप्त करण्यात आले आहे. सद्यस्थितीत तपास अधिक गतीने सुरू असून, आणखी आरोपी किंवा रेकॉर्डेड गुन्ह्यांची चौकशी केली जात आहे.

मधुकर पाण्डेय , पोलीस आयुक्त, मि.भा-व.वि पोलीस आयुक्तालय,दत्ताञय शिंदे, अपर पोलीस आयुक्त,प्रकाश गायकवाड, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-01, डॉ. विजयकुमार मराठे, सहाय्यक पोलीस आयुक्त, मिरारोड विभाग, राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रणजित आंधळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचा मार्गदर्शनाख्याली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काळे, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी खाडे, पोलीस हवालदार सतिष निकम, राहुल सोनकांबळे, रामधन डोभाल, मनोज ढोबळे, पोलीस शिपाई राहुल पंडागळे, राजेंद्र सुर्यवशी, संदिप चौधरी, मुकेश कांबळे यांनी उत्कृष्टरित्या कामगिरी करून आरोपीला अटक केलेली आहे.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

5 hours ago