मिरा रोड : कार चोरी करणाऱ्या तरुणाला पकडण्यात गुन्हे प्रकटीकरण शाखेला यश, आरोपीकडून चार कार हस्तगत
Mira Road Police Arrested Car Thief : कार चोरीचे प्रमाण वाढलं आहे. त्याअनुषंगाने या कार चोरांवर लक्ष ठेवण्यासाठी गुन्हे शाखेचे पथक तैनात ठेवण्यात आलं होतं. त्यानुसार सीसीटीव्ही व इतर माहितीनुसार पोलिसांनी कार चोराच्या मुसक्या आवळल्या,फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध
मिरा रोड :- कार चोरी करणाऱ्या एका तरुणाला मुंबईच्या गोवंडी Mumbai Govandi येथील बैगनवाडी परिसरातून अटक करून त्याला जेरबंद करण्यात आली आहे. तर त्याचा साथीदार हा फरार असून त्याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. पोलिसांनी आरोपीकडून चार चोरीच्या कार हस्तगत करण्यात आले आहे.अटक केलेल्या चोरट्याकडून आतापर्यंत 4 गुन्ह्यांची उकल झाली आहे.पोलिस आरोपीची सखोल चौकशी करत आहेत. चौकशीतून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. Mira Road Latest Crime News
मीरा-भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या काशीगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कार चोरीचे प्रकार वाढले आहे. जून आणि एप्रिल महिन्याच्या दरम्यान दोन कार चोरी प्रकरणाबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. एका प्रकरणात मिरा रोड येथे राहणाऱ्या विष्णू विठ्ठलराव फड यांची वेंगेनार कार ही त्यांच्या बिल्डींग खाली पार्क केली असता चोरीला गेली होती. या संदर्भात त्यांनी काशीगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. तर चंद्रकांत सदाशिव धागड (68 वर्ष ) यांची मारुती सुझुकी कार घराखालून चोरी झाल्याची तक्रार काशीगांव पोलीस ठाण्यात Kashigaon Police Station दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपीच्या विरोधात कलम 303(3) प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. Mira Road Latest Crime News
काशीगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत कार चोरीच्या घटना वाढत असताना या घटना आटोक्यात आणण्याकरिता तसेच आरोपींना शासन करण्याकरिता वरिष्ठ पोलिसांनी गुन्हे प्रकटीकरण विभागाला आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पोलिसांनी तब्बल वीस दिवस आरोपीच्या येण्या-जाण्याच्या मार्गाचा तसेच शंभर पेक्षा जास्त सीसीटीव्ही फुटेचा तपास करून 10 दिवस ट्रॉम्बे, गोवंडी घाटकोपर इत्यादी भागात संशयित आरोपीचा शोध घेतला असता एका संशयित आरोपीला पोलिसांनी गोवंडी बैगनवाडी, शिवाजीनगर मुंबई येथून ताब्यात घेतले होते. आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याने कार चोरी संदर्भात कबुली दिली आहे. तसेच अटक आरोपीचे नाव अहमदी नियमत अली शेख असे असून पोलिसांनी त्याच्याकडून इतर चार गुन्ह्याची उकल केली आहे. आरोपीच्या विरोधात काशीगांव पोलीस ठाण्यात दोन, मिरा रोड पोलीस ठाण्यात एक, विलेपार्ले पोलीस ठाण्यात एक असे एकूण चार कार चोरीचे गुन्हे दाखल आहे.गुन्हे उघड करुण आरोपीच्या ताब्यातुन कार जप्त करण्यात आलेले आहे. अटक आरोपी सोबत चोरी करण्याकरिता असलेला त्याचा साथीदार बबलु शेख, (गोवंडी, मुंबई ) हा फरार असुन त्याचा शोध सरु आहे. त्याचा शोध घेवुन त्यांनी या व्यतिरीक्त मुंबई, ठाणे, पालघर इत्यादी परिसरात कार चोरी केल्याची शक्यता असुन त्या अनुषंगाने अटक आरोपीकडे पुढील तपास पोलिस उप निरीक्षक किरण बगडाणे व पोलिस उप निरीक्षक अभिजीत लांडे हे करत आहे. Mira Road Latest Crime News
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलिस उप आयुक्त परिमंडळ-01, डॉ विजय मराठे, सहाय्यक पोलिस आयुक्त, मिरारोड विभाग, राहुलकुमार पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, काशिगांव पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली काशिगांय पोलीस ठाणेचे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी आणि अंमलदार यांनी केली आहे.