Mira Road Cricket Betting : मीरा रोडमध्ये अवैध ऑनलाईन क्रिकेट बेटिंगवर धाड; 1.67 लाखांचा मुद्देमाल जप्त

Mira Road Latest Cricket Betting News : बंद घरात बेटिंग खेळवणाऱ्या दोन आरोपींना अटक; पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 कार्यालयाची धडक कारवाई
मीरा रोड :- मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-1 Vasai Virar Police कार्यालयाच्या पथकाने मीरा रोड परिसरात अवैध ऑनलाईन क्रिकेट बेटिंगवर मोठी कारवाई केली आहे. एका बंद घरात बेकायदेशीर ऑनलाईन जुगार खेळवणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. Mira Road Latest Crime News
नेमकी कारवाई
23 ऑक्टोबर 2025 रोजी पोलीस उपायुक्त, परिमंडळ-1, राहुल चव्हाण यांना मीरा रोड पोलीस ठाणे Mira Road Police Station कार्यक्षेत्रात एका बंद घरात अवैध ऑनलाईन क्रिकेट बेटिंग सुरू असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारावर राहुल चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तात्काळ कारवाई करत संबंधित इमारतीतील बंद घरात छापा टाकला. यावेळी दोन इसम मोबाईलवरून वेगवेगळ्या खेळांवर बेकायदेशीर ऑनलाईन बेटिंग खेळताना आणि इतरांना खेळवताना रंगेहाथ पकडले गेले.
मुद्देमाल जप्त आणि गुन्हा दाखल
पोलिसांनी या दोन आरोपींच्या ताब्यातून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि विदेशी चलन यासह एकूण 1 लाख 67 हजार 280 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध मीरा रोड पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम-1887 च्या कलम 4,5सह कलम 25 (सी) भारतीय तार अधिनियमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त राहुल चव्हाण यांच्या पथकाने ही यशस्वी कामगिरी पार पाडली आहे.



