•जामीनावर सुटका करण्यासाठी व चांगला अभिप्राय (आय.ओ.टू.से.) देण्यासाठी लाच मागणाऱ्या नयानगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 70 हजार रुपयांची लाच घेताना पकडले.
मीरा रोड :- नयानगर पोलीसांनी एम.डी. विक्री करत असतांना पकडल्यावरून गुन्हा दाखल केला असून त्यातून जामीनावर सुटका करण्यासाठी व चांगला अभिप्राय (आय. ओ.टू.से.) देण्यासाठी लाच मागणाऱ्या नयानगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 50 हजार रुपयांची लाच घेताना पकडले.रामनाथ उमाजी तांदळकर असे लाचखोर उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी नयानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार यांचा भाऊ यास नयानगर पोलीस स्टेशनचे पोलीसांनी एम.डी. विक्री करत असतांना पकडल्यावरून त्याचे विरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यात त्याला 19 एप्रिल रोजी अटक केली आहे. भाऊ रोहित याची जामीनावर सुटका करण्यासाठी व चांगला अभिप्राय (आय. ओ.टू.से.) देण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक तांदळकर यांनी तक्रारदार यांचेकडे 70 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. परंतु तक्रारदार यांना पोलीस उपनिरीक्षक तांदळकर यांना लाच दयावयाची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक 23 एप्रिल रोजी पोलीस उपनिरीक्षक तांदळकर हे 70 हजार लाचेची मागणी करीत असले बाबत ॲन्टी करप्शन ब्यूरो, ठाणे कार्यालयात लेखी तक्रार नोंदवली.
त्याप्रमाणे दिनांक 23 एप्रिल रोजी करण्यात आलेल्या पडताळणी कारवाई मध्ये पोलीस उपनिरीक्षक तांदळकर नयानगर पोलीस ठाण्यात यांनी तक्रारदार यांचेकडे लाचेची मागणी करून तडजोडी अंती 50 हजार रुपये लाचेची रक्कम स्विकारण्याचे मान्य केले. 25 एप्रिल रोजी पोलीस उपनिरीक्षक तांदळकर यांना 50 हजार रलाचेची रक्कम स्वीकारतांना रंगेहात पकडण्यात आले.याप्रकरणी तांदळकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक विजय कावळे तपास करत आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…