•भारत – पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनारी पोलीस सुरक्षा वाढवली पोलीस घालणार समुद्रात गस्ती
मिरा रोड :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाकडून शहरासोबतच समुद्र किनाऱ्यांचीही सुरक्षा वाढवण्यात आली आहे.आयुक्तालयाच्या चार विशेष पोलीस बोटी समुद्रात सतत गस्त घालत असून, संशयास्पद बोटींवर लक्ष ठेवून त्यांची तपासणी करण्यात येत आहे. तर किनारपट्टीच्या भागात ही गस्त घातली जात आहे.
आयुक्तालयाकडे सध्या 17 टन आणि 19 टन क्षमतेच्या चार बोटी आहेत. या बोटींचा वापर सागरी हद्दीत गस्त घालण्यासाठी, गुन्हेगारांचा पाठलाग करण्यासाठी तसेच मदत व बचाव कार्यासाठी केला जातो.अलीकडच्या काळात भारत-पाकिस्तान दरम्यान निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई आणि आजूबाजूच्या समुद्र किनाऱ्यावरील शहरांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. समुद्र मार्गे घातपात घडवण्याची शक्यता लक्षात घेऊन, आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी सुरक्षाव्यवस्थेत अधिक बळकटी आणण्याचे आदेश दिले आहेत.मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात समुद्र किनाऱ्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने उत्तन, अर्नाळा आणि वसई सागरी पोलीस ठाण्याची उभारणी करण्यात आली आहे
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…