क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mira Bhayandar Spa Racket : “स्पा”च्या आड सेक्स रॅकेटचा पर्दाफाश! मिरा-भाईंदरमध्ये AHTC चा धडाकेबाज छापा

Mira Bhayandar Crime Branch Busted Spa Sex Racket : ‘Royal The Luxury Spa’मध्ये शरीरविक्रीचा गोरखधंदा; चार तरुणींची सुटका

मिरा-भाईंदर | शहरातील गजबजलेल्या SK स्टोन परिसरात, ‘Viva Spa’ व ‘Royal The Luxury Spa’ च्या चमकदार फलकांआड लपलेला सेक्स रॅकेटचा काळा धंदा Bhayandar Spa Sex Racket अखेर उघडकीस आला! सामाजिक कार्यकर्ते डॉ. बिनू वर्गीस यांच्या सतर्कतेमुळे AHTC MBVV क्राईम ब्रांचने सर्जिकल स्टाईल कारवाई करत या रॅकेटचा भंडाफोड केला. Mira Bhayandar Latest Crime News

लतीफ पार्क सोसायटीच्या पहिल्या मजल्यावर सुरू असलेल्या या स्पामध्ये ग्राहकांना मसाजच्या नावाखाली अश्लील सेवांची ऑफर दिली जात होती. मात्र पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली आणि मॅनेजर व महिला मालकिण नसीमा हिला ताब्यात घेतलं.

स्पा सेंटरमधून चार तरुणींची सुटका करण्यात आली असून, त्या सर्वांना पीडित म्हणून मान्यता देत पुनर्वसनासाठी हलवलं गेलं. या तरुणींना आर्थिक आणि सामाजिक अडचणींचा फायदा घेऊन या रॅकेटमध्ये ढकलल्याचं पोलिसांचं प्राथमिक निरीक्षण करण्यात आले आहे.

या धंद्याचा खरा सूत्रधार अद्याप फरार असून, त्याचा माग काढण्यासाठी क्राईम ब्रांचकडून विशेष पथक तयार करण्यात आलं आहे. या प्रकरणी BNS कलम 143, 3(3), 3(5) तसेच PITA कायद्याच्या कलम 3, 4, 5, 7 अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.क्राईम ब्रांचच्या या कारवाईने स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या अनैतिक धंद्यांचे जाळेच हादरून गेले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0