क्राईम न्यूज

Mira Bhayandar Sex Racket : मुंबईच्या फिल्म अभिनेत्रीची वेश्याव्यवसाय प्रकरणी अटक, दोन पीडित मुलींची सुटका

Mira Bhayandar Police Busted Sex Racket : चित्रपटसृष्टीतील ‘अनुष्का दास’ करते टीव्ही व बांगला सिनेमांतील अभिनेत्रींना वेश्याव्यवसायासाठी प्रवृत्त

ठाणे :- मुंबईच्या फिल्म इंडस्ट्रीत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीला पोलिसांनी वेश्याव्यवसाय चालवल्याप्रकरणी अटक केली आहे. ही अभिनेत्री टीव्ही मालिका आणि बांगला सिनेमामध्ये काम करणाऱ्या दोन महिलांना या व्यवसायासाठी प्रवृत्त करत होती. पोलिसांनी सापळा रचून केलेल्या या कारवाईत दोन्ही पीडित मुलींची सुटका करण्यात आली आहे. Mira Bhayandar Latest Crime News

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी अभिनेत्री अनुष्का दास (41 वय) Actress Anushka Das ही पुरुषांना मोबाईलवर संपर्क साधून त्यांना ग्राहक म्हणून बोलवत होती. त्यानंतर ती टीव्ही आणि बांगला सिनेमांमधील मुलींना घेऊन जात असे. त्यांच्या वेश्यागमनाचा मोबदला घेऊन ती आपले कमिशन कमावत होती.

ठाणे पोलिसांच्या महिला अत्याचार प्रतिबंधक पथकाला याबद्दल गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कायदेशीर बार्तुद करून एक बनावट ग्राहक तयार केला. या ग्राहकाने अनुष्का दासशी संपर्क साधला. अनुष्काने त्याला ठाण्यातील काशिमिरा येथील ठाकुर मॉलसमोर बोलावले. ठरलेल्या ठिकाणी पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला.

काशिमिरा परिसरात पोलिसांनी सापळा रचून केली कारवाई; आरोपीवर गुन्हा दाखल

छाप्यात पोलिसांनी अनुष्का दासला रंगेहाथ पकडले. तिच्यासोबत वेश्याव्यवसायासाठी आलेल्या दोन पीडित महिलांचीही सुटका करण्यात आली. पोलिसांनी अनुष्का दास हिच्यावर भारतीय न्याय संहिता 2023 कलम 143 (3) आणि अनैतिक व्यापार प्रतिबंध कायदा 1956 कलम 4,5 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास काशिमिरा पोलीस Kashmira Police Station करत आहेत. ही कारवाई पोलीस उप आयुक्त संदीप डोईफोडे आणि सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

vivek

Recent Posts