क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mira Bhayandar Police News : मिरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-1 अंतर्गत पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; संशयीत, अटक वारंट असलेले ताब्यात

Mira Bhayandar Police Combing Operation Latest News : प्रजासत्ताक दिनाच्या पृष्ठभूमिवर पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी 23 जानेवारीच्या रात्री ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवले.

मिरा रोड :- 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पृष्ठभूमिवर पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-1 अंतर्गत पोलिसांनी 23 जानेवारीच्या रात्री ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवले. Mira Bhayandar Police Combing Operation या अंतर्गत विविध 50 हुन अधिक आरोपींची तपासणी करून 03 जणांवर सी.आर.पी.सी. 126 प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. व 03 वॉरंटमधील आरोपी अटक करण्यात आली केसेस एनडीपीएस कायद्याने करण्यात आले आहे. 02 जणांवर 142 महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये कारवाई करण्यात आली, तसेच 1 दारूबंदी कारवायाही करण्यात आल्या. गुन्हेगारी प्रवृत्तींवर कायद्याचा वचक निर्माण होऊन समाजात शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने जिल्ह्यात 23 जानेवारीच्या रोजी रात्री विशेष ‘कोंबिंग ऑपरेशन’ व नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली.

कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदी दरम्यान एकूण 28 निगराणी बदमाश, 09 रेकॉर्डवरील माहितीगार गुन्हेगार, बीडब्ल्यू, एनबीडब्ल्यू व स्टॅडिंग वारंटच्या आरोपींची तपासणी करण्यात आली.
त्याशिवाय 53 हॉटेल, लॉज, धाब्यांचीही तपासणी करण्यात आली आणि दारूबंदी अधिनियम अंतर्गत कारवाया करण्यात आल्या. 198 वाहने नाकाबंदीच्या दरम्यान तपासण्यात आले असून 27 वाहनांवर महाराष्ट्र वाहतूक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम 102 अन्वये दहा कारवाई करण्यात आली आहे.मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, यांच्यासह दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त, यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश गायकवाड, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-1, मि.भा.व.वि.पोलीस आयुक्तालय व परिमंडळ-1अधिनस्त विभागीय सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व अंमलदार यांनी सदर कारवाईत सहभाग घेतला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0