क्राईम न्यूज

Mira Bhayandar Police News : मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचा दणका! 56 हजारांचे पिस्तूल-काडतुसे जप्त

Mira Bhayandar Police Latest News : खंडणी विरोधी पथकाने मुंबई-अहमदाबाद हायवेवर सापळा रचून कळव्यातील गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या

मीरा-भाईंदर :- मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या खंडणी विरोधी पथकाने अवैधरीत्या अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करत एक लक्षवेधी कामगिरी केली आहे. वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेनुसार गुप्त माहितीच्या आधारावर सापळा रचून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. Mira Bhayandar Police Latest News

2 नोव्हेंबर रोजी गुप्त बातमीदारामार्फत पोलीस निरीक्षक राहुल राख यांना माहिती मिळाली की, मुंबई-अहमदाबाद हायवेवरील शिरसाड फाटा येथील भारत पेट्रोल पंपाजवळ, साई लिला धाब्यासमोर अहमदाबाद वाहिनीवर एक इसम अग्नीशस्त्र घेऊन येणार आहे. या माहितीच्या आधारे खंडणी विरोधी पथकाच्या अधिकारी आणि अंमलदारांनी तात्काळ कारवाई करत निखील राजू यादव (वय 27, रा. कळवा पूर्व, जि. ठाणे) या आरोपीस ताब्यात घेतले. Mira Bhayandar Latest Crime News

आरोपी निखील राजू यादव याच्याकडून 01 अग्नीशस्त्र, 04 जिवंत काडतुसे आणि एक मोबाईल असा एकूण 56 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. याप्रकरणी निखील यादव याच्याविरोधात मांडवी पोलीस ठाणे येथे भारतीय हत्यार कायदा कलम 3, 25 (B) (a) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, मांडवी पोलीस ठाणे या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे.

पोलीस आयुक्त निकेत कौशीक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या Mira Bhayandar Crime Branch खंडणी विरोधी पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago