Mira Bhayandar Police : मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांच्या हस्ते “प्रबोध” अंतर महाविद्यालय स्पर्धेचे शुभारंभ…
Mira Bhayandar Police Organized Prabodh Competition : अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या औचित्य साधून, आयुक्तालयाकडून विविध स्पर्धेचे आयोजन, 11 नामांकित महाविद्यालयांचा सहभाग
मिरा रोड :- (26 जुन) अंमली पदार्थ विरोधी Drug Free Day दिनानिमित्त मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाकडून Mira Bhayandar Police महाविद्यालयीन विद्यार्थ्याकरिता रांगोळी, पोस्टर मेकिंग, रिल्स, एक पात्री नाटक, सांघिक नृत्य अशा एकूण पाच स्पर्धेचे आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांच्या हस्ते शुभारंभ करत या स्पर्धेला “प्रबोध”हे नाव दिले आहे. पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी स्पर्धेचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांना अंमली पदार्थाच्या सेवनाने होणारे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन केले आहे. तसेच अंमली पदार्थाची खरेदी-विक्री करणाऱ्या च्या विरोधात पोलिसांना तात्काळ कळविण्यासाठी व्हाट्सअप नंबर (08655865141) हा नंबर जारी केला असून तक्रार करणाऱ्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असे सांगण्यात आले आहे. Mira Bhayandar Police
प्रबोध कार्यक्रमात पोलीस आयुक्त यांच्यासह 500 विद्यार्थ्यांची उपस्थिती
एल आर तिवारी महाविद्यालय मिरा रोड येथे या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले असून 11 नामांकित महाविद्यालयाचे निवड करण्यात आली आहे. तसेच महाविद्यालयीन स्पर्धेचे “प्रबोध”असे नामकरण करण्यात आले असून पाच स्पर्धेचा याचा समावेश आहे.अंतिम फेरी 5 जुलै रोजी लता मंगेशकर नाट्यगृह मिरा रोड येथे पार पाडणार आहे. जनजागृतीचे विविध उपक्रम राबवत असताना आजच्या प्रबोध कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभात पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर पोलीस आयुक्त श्रीकांत पाठक, पोलीस उप आयुक्त प्रकाश गायकवाड, राहुल एज्युकेशन ग्रुप चे सेक्रेटरी राहुल तिवारी उपाध्यक्ष कृष्णा तिवारी यांच्यासह अकरा महाविद्यालयाचे प्राचार्य आणि एकूण 500 विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित होते. Mira Bhayandar Police
सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा मदन बल्लाळ, पोलीस निरीक्षक अमली पदार्थ विरोधी कक्ष अमर मराठे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरोसा असेल तेजश्री शिंदे यांनी या कार्यक्रमाला अंमली पदार्थाच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. Mira Bhayandar Police