क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mira Bhayandar Police : 6.89 लाखांच्या गांजा जप्तीने मिरा-भाईंदर पोलिसांच्या अंमली पदार्थाविरुद्ध मोहिमेचा मोठा यश

Mira Bhayandar Police Busted Drug Racket : आरोपींना अटक, टॅक्सी आणि रोख रक्कमही जप्त; तपास सखोल सुरू

मिरा-भाईंदर :- महाराष्ट्र पोलीस महासंचालकांच्या निर्देशानुसार अंमली पदार्थविरोधातील विशेष मोहीमेअंतर्गत मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाने Mira Bhayandar Police अवैध गांजा विक्रीचा मोठा धाडसी फोड उघडला आहे. काशिमिरा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने Mira Bhayandar Kashmira Crime Branch 29 मे 2025 रोजी महाजनवाडी, मिरा गावठाण परिसरातून तब्बल 34.484 किलो वजनाचा गांजा जप्त केला असून, त्याची किंमत तब्बल 6 लाख 89 हजार 680 रुपये आहे.

34.48 किलो गांजा, महाजनवाडी परिसरातून ताब्यात; गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई

या कारवाईत समचुर जाफर गाझी (42 वय), आसिफ इसरत अली अन्सारी (22 वय), आणि राजु चैतई सैनी (43 वय) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच, २2 लाख रुपये किंमतीची अवैध वापरातील टॅक्सी आणि मोठ्या प्रमाणात रोख रक्कमही पोलीसांनी जप्त केली आहे. यामुळे एकूण मुददेमालाची किंमत 8 लाख 97 हजार 530 रुपये आहे.

तपासात पुढे वाढ करून, पोलीसांनी या गांजा विक्रीसाठी पुरवठादार जियारूल अब्दुल गफुर सरदार (40 वय) यालाही 2 जून 2025 रोजी अटक केली आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, गुन्ह्याचा तपास अजूनही सखोल सुरू आहे.

मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयाच्या या धडाकेबाज कारवाईने परिसरातील अंमली पदार्थाच्या तस्करीवर मोठा आघात झाल्याचे समजते. पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार अशी मोहीम सतत राबवली जात आहे, ज्यामुळे नागरिकांचा विश्वास वाढत असून अपराधी यंत्रणा खारावून निघत आहे.

कामगिरी मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त, मि.भा-व.वि पोलीस आयुक्तालय,दत्ताञय शिंदे, अपर पोलीस आयुक्त,प्रकाश गायकवाड, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ-1,
डॉ. विजयकुमार मराठे, सहाय्यक पोलीस. आयुक्त, मिरारोड विभाग,राजेंद्र कांबळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, काशिमिरा पोलीस ठाणे,
रणजित आंधळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचा मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश काळे, पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल बेलोसे,शिवाजी खाडे, पोलीस हवालदार स्वप्निल मोहीले,रामधन ढोबाळ,मनोज ढोबळे, पोलीस शिपाई पंडागळे,राजेंद्र सूर्यवशी,संदिप चौधरी,मुकेश कांबळे यांनी उकृष्टरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0