Mira Bhayandar Police Bharti 2024: मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस शिपाई भरती लेखी परीक्षा मिरा रोडच्या तिवारी महाविद्यालयात होणार..
Mira Bhayandar Police Bharti 2024: 07 जुलै रोजी होणाऱ्या पोलीस शिपाई लेखी परीक्षा मिरा रोडच्या एल आर तिवारी इंजिनिअर अँड डिग्री महाविद्यालयात होणार आहे.
मिरा रोड :- मीरा-भाईंदर वसई विरार Mira Bhayandar Police पोलीस आयुक्तालय मध्ये झालेल्या पोलीस शिपाई भरती 2022-23 Police Bharti 2024 घेण्यात आली होती. 24 जून ते 01 जुलैदरम्यान मैदानी चाचणी परीक्षा महानगरपालिकेच्या बेवर्ली पार्कमध्ये झाली होती.
मैदानी परीक्षेत पात्र झालेल्या उमेदवारांना लेखी परीक्षेसाठी दिनांक 07 जुलै रोजी एल आर तिवारी इंजिनिअरिंग अँड डिग्री कॉलेज कनकिया सेवन इलेव्हन क्लबजवळ, मिरा रोड पूर्व येथे घेण्यात येणार आहे. तसेच मैदानी चाचणीमध्ये पात्र उमेदवारांनाही 07 जुलैला सकाळी 09.00 पहिले लेखी चाचणीसाठी हजर राहावे असे पोलीस आयुक्तालयाकडून सांगण्यात आले आहे.पोलीस भरती प्रक्रियेचा अंतिम निकाल हा मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे संकेतस्थळ https://mbvv.mahapolice.gov.in/Recruitment वर प्रसारित करण्यात येईल.याबाबत काही शंका असल्यास हेल्प लाईन नंबर ७०२१९९५३५२/०२२- ३५००६११४ यावर संपर्क साधावा. Mira Bhayandar Police Bharti 2024 Update