क्राईम न्यूज

Mira Bhayandar News : 13 वर्षांनी खुनी जाळ्यात! दिल्लीच्या गल्लीत सापडला निघृण हत्याकांडाचा सूत्रधार

Kashmira Crime Branch Arrested Criminal : दिल्ली-बिहारमध्ये बदललेल्या नावाने राहत होता आरोपी, काशीमिरा गुन्हे शाखेच्या पथकाची जबरदस्त कामगिरी

भाईंदर | 2012 साली भाईंदर पूर्व येथील एका तरुणाची अंगावर शहारे आणणारी, अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करून पसार झालेल्या आरोपीला तब्बल 13 वर्षांनी अखेर दिल्लीच्या गल्लीतील एका दुकानातून अटक करण्यात काशीमिरा गुन्हे शाखा, कक्ष-1 Kashmira Crime Branch Unit 1 ला मोठं यश मिळालं आहे. Kashmira Latest Crime News

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,ही थरारक घटना 28 मे 2012 रोजी रात्री घडली होती. मृतक सुरेशकुमार चौधरी (वय 35) याची आरोपी गोविंद कुमार चौधरी याने त्याच्याच घरात इलेक्ट्रिक इस्त्रीच्या वायरने गळा आवळून, तोंडावर चिकटपट्टी लावून, लोखंडी दांड्याने डोके फोडून व कटर आणि धारदार हत्याराने वार करत निर्घृण हत्या केली होती. इतकंच नाही, तर मृतदेहाची विटंबनाही केली होती. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला होता.

गुन्ह्यानंतर आरोपी देशभरात लपूनछपून राहत होता. अनेक वेळा बिहारमधील ठिकाणी पोलीस शोध घेऊनही तो सापडला नव्हता. मात्र काशीमिरा गुन्हे शाखेने समांतर तपास करत तांत्रिक माहिती व गुप्त खबऱ्यांच्या आधारे दिल्लीतील नया बाजार येथून आरोपीला शॉप नंबर 2712, पत्तेवाली गल्ली या ठिकाणी शोधून काढलं. अटक झाल्यानंतर त्याने आपला गुन्हा कबूल केला असून, तो नवा पत्ता व ओळख घेऊन दीर्घकाळ दिल्ली व बिहारमध्ये लपून राहत होता, हे समोर आले आहे.

अटकेसाठी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने ही कारवाई पार पाडली. या यशस्वी ऑपरेशनसाठी पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय, अपर आयुक्त दत्तात्रय शिंदे व उपायुक्त अविनाश अंबुरे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. आरोपीविरुद्ध कलम 302 अन्वये गुन्हा दाखल असून पुढील तपास नवघर पोलीस करत आहेत.

vivek

Recent Posts