
Mira Bhayandar Latest News : बँक अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी सायबर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ यांचे मार्गदर्शन; फिशिंग, सोशल मीडिया गुन्हे आणि तक्रार नोंदवण्यावर सविस्तर चर्चा
मीरा रोड :- मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस Vasai Virar Police आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात सामान्य नागरिकांमध्ये सायबर विषयाची जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने अॅक्सिस बँक, शांती पार्क शाखेत विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पोलीस आयुक्त यांच्या संकल्पनेतून पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे यांच्या सूचनेनुसार हा कार्यक्रम 5 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 ते 6 दरम्यान आयोजित करण्यात आला होता. Vasai Virar Cyber Crime Awareness
या कार्यक्रमात बँकेतील 25 ते 60 वयोगटातील सुमारे 25 ते 30 अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. बँकेचे अध्यक्ष रसीक नरुला यांनी कार्यक्रमाची रूपरेषा ठरवली होती.
सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ यांचे महत्त्वाचे मार्गदर्शन
सायबर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ यांनी उपस्थितांना सायबर सुरक्षेबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. त्यांनी खालील महत्त्वाच्या विषयांवर माहिती दिली:
सध्या घडणारे वेगवेगळे सायबर गुन्हे (Trending Cyber Crimes).
सोशल मीडिया संदर्भात घडणारे गुन्हे आणि सुरक्षितता (Social Media Related crimes/etiquette).
ऑनलाईन सायबर गुन्ह्यांना कशाप्रकारे टाळता येईल यासाठी घ्यावयाची काळजी (Precautions to be Taken).
ऑनलाईन गुन्ह्यास बळी पडल्यास तात्काळ कोठे आणि कश्याप्रकारे तक्रार नोंदविता येईल (Where and How to Complaint?).
सहाय्यक पोलीस निरीक्षक वाव्हळ यांनी दैनंदिन जीवनातील इंटरनेट व्यवहारांदरम्यान सुरक्षितता कशी पाळावी, तसेच फसवणूक झालेल्या नागरिकांनी बँकेत संपर्क साधल्यास पुढील कायदेशीर कारवाईबाबतही मार्गदर्शन केले.
अध्यक्षांकडून आभार
उपस्थित श्रोत्यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. बँकेचे अध्यक्ष रसीक नरुला यांनी सायबर विषयक उपयुक्त माहिती व मार्गदर्शनासाठी सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील वाव्हळ यांचे आभार मानले. यावेळी सायबर गुन्हे जनजागृतीबाबतची पत्रकेही वाटप करण्यात आली.


