महाराष्ट्र

Mira Bhayandar News : मीरा-भाईंदर पोलिसांची मोठी कारवाई : 12 बांगलादेशी घुसखोरांना हद्दपार

•अवैध कागदपत्रे वापरून वास्तव्य करणाऱ्या 6 पुरुष, 4 महिला व 2 मुलांचा समावेश; सीमापार करण्याचा आदेश

मीरा-भाईंदर :- मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत राहणाऱ्या 12 बांगलादेशी घुसखोरांना पोलिसांनी शोधून हद्दपार केले आहे. पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांच्या आदेशानुसार 1 ऑगस्टपासून सुरू असलेल्या विशेष मोहिमेत ही कारवाई करण्यात आली असून, यामध्ये अवैध मार्गाने भारतात वास्तव्य करणाऱ्यांवर कठोर पाऊल उचलण्यात आले आहे.

काशिमिरा, तुळींज आणि नालासोपारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या या 12 बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांच्याकडे भारतात राहण्यासाठी कोणतीही वैध कागदपत्रे नसल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी अवैध मार्गाने बनावट कागदपत्रे मिळवून भारतात प्रवेश केल्याचे आणि वास्तव्यास असल्याचे मान्य केले आहे.

पश्चिम बंगालमधून सीमापार

अवैध घुसखोर बांगलादेशी नागरिकांमध्ये 6 पुरुष, 4 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे. या सर्वांना 7 ऑगस्ट रोजी पश्चिम बंगालमधील बागडोरा सीमेवरून बांगलादेशात हद्दपार करण्यात आले आहे.

पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वी झाली आहे. अवैध मार्गाने भारतात येणाऱ्यांवर भविष्यातही अशीच कठोर कारवाई केली जाईल, असे संकेत पोलिसांनी दिले आहेत.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

2 hours ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

20 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

20 hours ago