महाराष्ट्र
Trending

Mira Bhayandar News : प्राचार्य, मुख्याध्यापक यांना नविन कायदयाचे जनजागृती अभियान

Mira Bhayandar Police Latest News : मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय यांच्याकडून प्राचार्य आणि मुख्याध्यापक यांच्याकरिता नविन कायदयाचे जनजागृती अभियान सुसंवाद कार्यक्रम

मिरा रोड :- भारतीय राज्यघटनेत भारतीय न्यायव्यवस्थेमधील अनेक कायद्यांमध्ये अमुलाग्र बदल केले आहे. भारतीय न्याय संहिता 2023 मध्ये अनेक कलमामध्ये दुरुस्ती करण्यात आली आहे तसेच काही कायदे बदल करून त्याचे नव्याने कायदे बनवले आहे याचा प्रचार आणि प्रसार करण्याकरिता प्रशासनाने नागरिकांकरिता संवाद मेळावे आयोजित केले जातात. असाच कार्यक्रम मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय परिमंडळ-1 परीसरातील शाळांचे मुख्याध्यापक व महाविदयालयाचे प्राचार्य यांना नविन कायदे जनजागृती कार्यक्रम मिरा रोड येथील “संवाद हॉल” येथे आयोजित करण्यात आला होता.प्रमुख वक्ते म्हणून ॲड.संजयकुमार पाटील, कायदेशीर सल्लागार/सरकारी अभियोक्ता, (महाराष्ट्र पोलीस अकॅडमी, नाशिक) यांना आमंत्रित करण्यात आले.मिरा-भाईंदर परिसरामधील 104 कॉलेज, शाळा मधील 110 प्राचार्य व मुख्याध्यापक व प्रतिनिधी हजर होते.

पोलीस आयुक्त यांनी उपस्थित प्राचार्य व मुख्याध्यापक यांना शाळामध्ये लहान मुलांना गुड टच बॅड टच बाबत शिक्षण देण्याबाबत सूचना केल्या आहे. शाळा कॉलेजमध्ये काम करणारे सुरक्षा रक्षक, साफसफाई कर्मचारी, स्कुल बसमधील चालक, अटेंडंट यांची पोलीस चारित्र्य पडताळणी करणेबाबत तसेच सर्व शाळा कॉलेजमधील जास्तीत जास्त एरिया सी.सी. टिव्हीचे निगराणीसाठी आणण्याबाबत सूचना आणि मार्गदर्शन पोलिस आयुक्तांनी या कार्यक्रमादरम्यान केले आहे. तसेच शाळा कॉलेजमधील मुलांना अंमली पदार्थांच्या सवयी पासून दूर ठेवणेसाठी, वाहतुकीचे नियमांचे पालन, तसेच सायबर क्राईमच्या गुन्हयांची जनजागृती याबाबत मार्गदर्शन करुन प्राचार्य व मुख्याध्यापक यांचे सोबत संवाद साधला. वाहतुकीचे नियम पाळने बाबत, सायबर गुन्हयापासुन सावध राहण्याबाबत तसेच अंमली पदार्थापासून दुर राहण्याबाबत अवाहन पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0