Mira Bhayandar Crime Branch Latest News : पहाटेच्या सुमारास गुन्हे प्रकटीकरण शाखेचा छापा, हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त
मीरा-भाईंदर :- मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने Mira Bhayandar Police अवैध हुक्का पार्लर आणि बेकायदेशीर व्यवसायांविरुद्ध विशेष मोहीम हाती घेतली आहे. याचाच भाग म्हणून गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-1 ने भाईंदर पूर्वेकडील एका पंचतारांकित हॉटेलमधील ‘बादशहा लाऊंज’ या हुक्का पार्लरवर पहाटेच्या सुमारास छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी 110 तरुण-तरुणींना हुक्का आणि विदेशी मद्याची पार्टी करताना रंगेहाथ पकडले. Mira Bhayandar Police Latest News
‘बादशहा लाऊंज’मध्ये बेकायदेशीर धंदा
पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, भाईंदर पूर्वेकडील शिवराज चेंबरमधील हॉटेल सिल्वर क्लाऊडमध्ये ‘बादशहा लाऊंज’ नावाचे हुक्का पार्लर सुरू होते. येथे ग्राहकांना महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तंबाखू मिश्रित पदार्थ हुक्क्याद्वारे दिला जात होता. तसेच, कोणतीही परवानगी नसताना विदेशी मद्यही पुरवले जात होते. Mira Bhayandar Police Raid On illegal Hukkah Parlour
या माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने दोन पंचांना सोबत घेऊन पहाटेच्या सुमारास अचानक छापा टाकला. त्यावेळी वेगवेगळ्या शहरांमधील (मीरा-भाईंदर, मुंबई, ठाणे आणि नाशिक) तब्बल 110 तरुण-तरुणी येथे हुक्का आणि दारूचे सेवन करताना आढळून आले.
आरोपींना बेड्या
या कारवाईनंतर पोलिसांनी ‘बादशहा लाऊंज’चे भागीदार इरफान खान उर्फ गुड्डू, यश तिवारी यांच्यासह मॅनेजर, कॅशिअर आणि वेटर अशा एकूण आठ आरोपींविरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सिगारेट आणि इतर तंबाखू उत्पादने अधिनियम तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायद्यांतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. जप्त केलेला मुद्देमाल आणि आरोपींना पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी नवघर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-1, काशीमीरा येथील पोलीस निरीक्षक सुशीलकुमार शिंदे यांच्या पथकाने केली. या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…