Mira Bhayandar Latest Crime News : लिंकवर क्लिक करताच बँक खाते झाले होते रिकामे; ‘नयानगर’मधील तक्रारदाराला सायबर सेलमुळे मिळाला दिलासा
मिरा-भाईंदर | मोबाईलवर आलेल्या एका संशयास्पद ‘फेक मेसेज’मुळे फसवणूक झालेल्या नागरिकाला मिरा-भाईंदर, वसई-विरार सायबर पोलीस Mira Bhayandar Cyber Police ठाण्याने मोठा दिलासा दिला आहे. सायबर भामट्यांनी लंपास केलेले 98 हजार रुपये तक्रारदाराला सुरक्षितपणे परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले आहे.
नेमकी घटना काय?
नयानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे शेख यांना त्यांच्या मोबाईलवर एक मेसेज प्राप्त झाला होता. मेसेजमध्ये दिलेल्या एका लिंकवर त्यांनी क्लिक केले असता, त्यांचा मोबाईल ‘अपडेट’ होत असल्याचा मेसेज दिसला. मात्र, मोबाईल सुरळीत चालू झाल्यानंतर शेख यांना धक्काच बसला; त्यांच्या बँक खात्यातून तब्बल 98 हजार रुपये कपात झाल्याचे मेसेज त्यांना मिळाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधला.
सायबर पोलिसांची तत्परता
तक्रार मिळताच सायबर पोलीस ठाण्याने ‘NCCRP’ पोर्टलवर (नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टल) तातडीने नोंद केली. यामुळे शेख यांच्या खात्यातून गेलेली रक्कम ज्या वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वर्ग झाली होती, ती तात्काळ ‘फ्रीज’ (गोठवण्यात) करण्यात आली. यामुळे सायबर चोरांना ती रक्कम काढता आली नाही.
न्यायालयीन प्रक्रियेनंतर रक्कम परत
थांबवलेली रक्कम कायदेशीररीत्या परत मिळवण्यासाठी सायबर पोलिसांनी तक्रारदाराला न्यायालयात अर्ज करण्याच्या सूचना दिल्या. सायबर पोलिसांनी न्यायालयात सविस्तर अहवाल सादर केला. न्यायालयाचे आदेश प्राप्त होताच फसवणुकीची पूर्ण रक्कम तक्रारदाराच्या खात्यात पुन्हा जमा करण्यात आली.
या पथकाने बजावली कामगिरी
ही मोहीम पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदिप डोईफोडे, सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी प्रकाश सावंत, पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील वाव्हळ, माणिकराव कतुरे, आणि त्यांच्या टीमने या प्रकरणात तांत्रिक कौशल्याचा वापर करून यश मिळवले.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…