Mira Bhayandar Honey Trap News : देशभरातील 51 गुन्हे उघड; मिरा-भाईंदर गुन्हे शाखेची आंतरराष्ट्रीय टोळीवर धडक कारवाई, 7 आरोपी गजाआड
मिरा-भाईंदर | मॅट्रीमोनिअल साईट्सवर जोडीदार शोधणाऱ्यांना ‘प्रेमजाळात’ ओढून नंतर त्यांच्या आयुष्यभराची कमाई लुटणाऱ्या एका महाभयंकर आंतरराष्ट्रीय सायबर टोळीचा मिरा-भाईंदर, वसई-विरार गुन्हे शाखा (कक्ष-4) ने पर्दाफाश केला आहे. या टोळीने केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण भारतात 200 कोटींहून अधिक रुपयांचा डल्ला मारला असून याचे धागेदोरे परदेशापर्यंत पोहोचले आहेत. Mira Bhayandar Latest Crime News
‘लव्ह’चा बनाव अन् ‘लूट’चा डाव: मोडस ऑपरेंडी
ही टोळी अत्यंत शातिर पद्धतीने काम करायची. मॅट्रीमोनिअल आणि सोशल मीडिया साईट्सवर ही मंडळी हायप्रोफाईल व्यक्तींच्या खोट्या प्रोफाईल्स तयार करायची. एकदा का संवाद सुरू झाला की, समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादन करून त्यांना ‘Forex Trading’ आणि ‘Gold Trading’ मध्ये गुंतवणूक केल्यास लाखो रुपये कमावता येतील, असे आमिष दाखवले जायचे. पीडित व्यक्तींना बनावट वेबसाईटच्या लिंक पाठवून विविध बँक खात्यांमध्ये पैसे भरायला लावून त्यांची फसवणूक केली जात होती.
हायवेवरील लॉजवर छापा अन् गुपित उघड!
मुंबई-अहमदाबाद हायवेवरील बापाने गाव येथील ‘शिवसाई रेसिडन्सी’ लॉजवर गुन्हे शाखेने धाड टाकली. तिथे संशयास्पदरीत्या लॅपटॉप आणि मोबाईलवर बँक खात्यांचे व्यवहार करणाऱ्या 5 जणांना ताब्यात घेतल्यावर या महाघोटाळ्याचे गुपित उघड झाले. तपासादरम्यान आतापर्यंत एकूण 7 आरोपींना अटक करण्यात आली असून मुख्य सूत्रधार परदेशातून हे रॅकेट चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
अटक करण्यात आलेले आरोपी
1) रोशनकुमार सिथारामा शेट्टी,
2) साबिर मोहम्मद खान,
3) सनद संजीव दास,
4) राहुलकुमार उर्फ कैलाश राकेशकुमार,
5) आमिर करम शेर खान,
6) अभिषेक अनिल नारकर,
7) मोहम्मद रशिद फकीर मोहम्मद बलोच.
संपूर्ण भारताला विळखा; 51 गुन्ह्यांची कबुली
अटक केलेल्या आरोपींनी केवळ महाराष्ट्रातच नाही, तर दिल्ली, हरियाणा, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, पश्चिम बंगाल आणि उत्तराखंडसह अनेक राज्यांतील निष्पाप नागरिकांना लुटल्याची कबुली दिली आहे.
महाराष्ट्र कनेक्शन: मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड, नागपूर, जळगाव आणि धुळे जिल्ह्यात या टोळीने मोठे हात मारले आहेत.
पोलीस आयुक्तांची धडाकेबाज कामगिरी
पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे आणि पोलीस उप-आयुक्त संदिप डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-4 चे प्रभारी पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख आणि त्यांच्या पथकाने ही मोठी कामगिरी केली आहे. या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारीच्या जगाला मोठा हादरा बसला आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…