Mira-Bhayandar: नालासोपारातील सागपाडा आणि डोंगरपाडा परिसरातील हातभट्टी दारूचा अड्डा पोलिसांकडून उद्ध्वस्त
Mira-Bhayandar Gavathi Bhatti Daru Adda Busted : गावठी हातभट्टी दारू करणारा दोन मोठ्या अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकून,अड्डे उध्वस्त करण्यात आले आहे,
नालासोपारा :- सानपाडा, डोंगरपाडा लगतच्या जंगलातील डोंगर परिसर येथील हातभट्टी दारू अड्ड्यावर विरार पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष-3 पोलिसांनी Virar Crime Branch 3 छापा टाकून हातभट्टी अड्डा उद्ध्वस्त केले आहे. MBVV Cops Bust Massive Hooch Brewing Den In Nallasopara Jungle या प्रकरणी पोलिसात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गुन्हे शाखा कक्ष-3 विरार पोलीस अंमलदार तुषार हिरामण दळवी यांना पोलिस मिळालेली अधिक माहिती अशी की, नालासोपारा तालुक्यातील सागपाडा आणि डोंगरपाडा येथे मानवी शरीराला धोकादायक असणारी विषारी रसायने वापरून हातभट्टी दारू तयार केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. Virar Latest Crime News
गोपनीय बातमीदार याचे मार्फतीने गुन्हे शाखा कक्ष-3 च्या पथकाला माहिती मिळाली की, नालासोपारा पूर्व, सागपाडा, डोंगरपाडा लगतच्या जंगलातील डोंगर परिसरात बेकायदेशीर रित्या गावठी हातभट्टी दारु तयार करणा-या दोन मोठे अड्डे असुन तेथे मोठया प्रमाणात गावती हात भट्टी दारु तयार होत असल्याची माहिती मिळाल्याने बॅरलमध्ये विषारी रसायने वापरून हातभट्टी दारू तयार करीत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी पोलीस आल्याची चाहूल याप्रसंगी पोलिस पथकाने घटनास्थळावरुन हातभट्टी दारू तयार करण्यासाठी लागणारे तब्बल 1520 नवसागरगुळ मिश्रीत वॉश लिटर विषारी रसायन, दोन तांचा धातुच्या टाक्या, दोन तांचा घातुचे थाळीचा टाच (सतेले), दोन लाकडी चाटु त्यास स्टिल धातुची नळी असलेले अशी गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याची साधने मिळून आले असून असे एकूण 1 लाख 56 हजार 200 रुपयांचे साहित्य जप्त केले. यावेळी उर्वरित मुद्देमाल जागीच नष्ट केला. पेल्हार पोलीस ठाणे Pelhar Police Station गुन्हा महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (ब) (क) (ड) (फ) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. Virar Latest Crime News
पोलीस पथक
मधुकर पाण्डेय, पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त अविनाश अंबुरे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे), मदन बल्लाळ सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मि.भा.व.वि. पोलीस आयुक्तालय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक / प्रमोद बडाख, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, पोलीस हवालदार मनोज चव्हाण, मुकेश तटकरे, सागर बारवकर, अश्विन पाटील, पोलीस अंमलदार राकेश पवार, तुषार दळवी, प्रविण वानखेडे, गणेश यादव, सागर सोनवणे सर्व नेमणूक गुन्हे शाखा कक्ष-3 विरार यांनी पार पाडली आहे. Virar Latest Crime News