क्राईम न्यूज

Mira Bhayandar Fraud News : ऑनलाइन फसवणुकीतील 14.55 लाख रुपये सायबर पोलिसांनी मिळवले परत

Mira Bhayandar Cyber Police Latest News : सायबर पोलीस ठाण्याचा प्रभावी तपास; फसवणूक झालेल्या व्यक्तीला मोठा दिलासा

मिरा-भाईंदर :- ऑनलाइन ॲपमध्ये गुंतवणूक करून फसवणूक झालेल्या एका तक्रारदाराचे तब्बल 14 लाख 55 हजार रुपये परत मिळवण्यात मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या सायबर पोलीस ठाण्याला मोठे यश मिळाले आहे. या कामगिरीमुळे फसवणूक झालेल्या व्यक्तीला मोठा आर्थिक दिलासा मिळाला आहे. Mira Bhayandar Latest Crime News

मिरा रोड परिसरात राहणाऱ्या महिला बिजॉय यांनी सोशल मीडियावर एका ‘ऑनलाइन इन्वेस्टमेंट ॲप’ची जाहिरात पाहिली. या ॲपमध्ये पैसे गुंतवून चांगला परतावा मिळत असल्याचे त्यांना दाखवण्यात आले होते. या आमिषाला बळी पडून त्यांनी मोठी रक्कम ॲपमध्ये गुंतवली. मात्र, त्यांना कोणताही परतावा मिळाला नाही आणि त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. Mira Bhayandar Cyber Fraud News

सायबर पोलिसांची तत्परता

तक्रार दाखल होताच, पोलिसांनी तात्काळ NCCRP पोर्टलवर (NCCRP Portal 31906250094075) याची नोंद केली. तपासादरम्यान, फसवणुकीची रक्कम अनेक वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये वळवण्यात आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. सायबर पोलिसांनी या व्यवहारांचा सखोल तपास करून सुमारे 20 संशयित बँक खात्यांची माहिती मिळवली. त्यांनी या सर्व खात्यांशी संपर्क साधून 15 खात्यांमधील रक्कम थांबवण्यात यश मिळवले.

या थांबवलेल्या 15 बँक खात्यांमधील रक्कम परत मिळवण्यासाठी पोलिसांनी तक्रारदारांना न्यायालयात अर्ज सादर करण्याचा सल्ला दिला. तक्रारदारांनी याचिका दाखल केल्यानंतर, सायबर पोलीस ठाण्याने न्यायालयाला सविस्तर अहवाल सादर केला आणि न्यायालयाचे आदेश प्राप्त केले.

चार महिन्यांचा पाठपुरावा

न्यायालयाच्या आदेशानंतर, सायबर पोलिसांनी तब्बल चार महिने 15 वेगवेगळ्या बँकांसोबत सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे तक्रारदार बिजॉय यांची फसवणूक झालेली संपूर्ण 14 लाख 55 हजार रुपयांची रक्कम त्यांच्या मूळ खात्यात परत मिळवण्यात आली. रक्कम परत मिळाल्यानंतर, त्यांना एक प्रतिकात्मक चेक देऊन याची माहिती देण्यात आली.

या यशस्वी कामगिरीसाठी पोलीस उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक सुजितकुमार गुंजकर आणि त्यांच्या पथकाचे कौतुक करण्यात येत आहे. या पथकात सपोनि स्वप्नील वाव्हळ, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद शेनोळकर, धनवडे, आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश होता.

vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

39 minutes ago

मुंबई पालिकेचा ‘महा’बजेट: 80,952 कोटींचा विकास आराखडा! फेरीवाल्यांना आता ‘QR कोड’चे सुरक्षा कवच, तर अनधिकृत बांगलादेशींवर कठोर कारवाई

Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…

18 hours ago

मुंबईचा ‘महा’अर्थसंकल्प: 80,952 कोटींची विकासाची झेप! राखीव निधीतून 13 हजार कोटींचा अंतर्गत डोस, निवडणुकीनंतर पालिकेचा खजिना खुला

Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…

18 hours ago