Mira Bhayandar Drug Busted News : मीरा-भाईंदर परिसरात ड्रग्ज माफियांवर कारवाई करत पोलिसांनी 14 किलो कोकेन जप्त केले आहे. छाप्यादरम्यान तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मिरा रोड :– मीरा-भाईंदर परिसरातील काशिमीरा परिसरात ड्रग्ज माफियांवर मोठी कारवाई करताना, Mira Road Kashmira Drug Busted News पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट-1 ने 14 किलो कोकेन ड्रग्ज जप्त केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात या कोकेनची किंमत सुमारे 22.33 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. Mira Road Latest Crime News
नवघर पोलीस स्टेशन Navghar Police Stationहद्दीतील मोतीलाल नगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. काशिमीरा गुन्हे शाखा युनिट-1 ला Kashmira Crime Unit 1 मिळालेल्या माहितीच्या आधारे, भाईंदर पूर्व येथील सबिना नझीर शेख (वय 42) हिच्या घरी छापा टाकण्यात आला. छाप्यादरम्यान मोठ्या प्रमाणात कोकेन जप्त करण्यात आले.
या कारवाईत पोलिसांनी दोन महिलांसह तीन आरोपींना अटक केली आहे. आरोपी महिलांपैकी एक नायजेरियन नागरिक आहे. ड्रग्ज तस्करी करणाऱ्या टोळीविरुद्ध ही एक महत्त्वाची आणि मोठी कारवाई मानली जात आहे. पोलिसांनी आता पुढील तपास सुरू केला आहे आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर लोकांचा शोध सुरू आहे.Andy Ubabudike Onyinsc,(age 45) आणि Christabel Enjei असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
चौकशीदरम्यान अँडीने सांगितले की, हे ड्रग्ज त्याने त्याची महिला सहकारी, कॅमेरूनची नागरिक असलेली क्रिस्टेबेल एन्जेई, (32 वय) , वसई पूर्व, पालघर येथे राहते, तिच्याकडून मिळवले होते. त्याच दिवशी क्रिस्टेबेललाही अटक करण्यात आली आणि पोलिसांनी 433 ग्रॅम कोकेन जप्त केले ज्याची किंमत 64 लाख 98 हजार रुपये आहे, तसेच 1 लाख रुपये भारतीय चलन, 1000 रुपयांच्या 174 नायजेरियन नायरा नोटा, 500 रुपयांच्या 48 नोटा आणि 100 अमेरिकन डॉलर्सच्या 14 नोटा आणि चार मोबाईल फोन जप्त केले.
22 कोटी 30 लाख 20 हजार रुपये किमतीचे 14.868 किलो कोकेन, तसेच 2 लाख 84 हजार 430 रुपये भारतीय रोख, वर उल्लेख केलेले नायजेरियन आणि अमेरिकन चलन आणि चार मोबाईल फोन जप्त केले आहेत.
हि कारवाई मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय,दत्तात्रय शिंदे, अपर पोलीस आयुक्त ,अविनाश अंबुरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, मदन बल्लाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा,भास्कर पुकळे, सहाय्यक पोलीस आयुक्त आर्थिक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष-1 काशिमीरा येथील पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत, पोलीस उपनिरीक्षक संदीप शिंदे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील, अविनाश गर्जे, संजय शिंदे, संतोष लांडगे, पुष्पेंद्र थापा, पोलीस हवालदार अश्विन पाटील, सुधीर खोत, सचिन हुले, पोलीस अंमलदार प्रशांत विसपुते, धिरज मेगाणे, गौरव बारी, सौरभ इंगळे तसेच महिला सहा. फौज दिपाली जाधव, सहाय्यक फौजदार संतोष चव्हाण (सायबर गुन्हे शाखा) मसुब किरण आसवले यांनी केली आहे. गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश भागवत गुन्हे शाखा कक्ष-1 काशिमीरा हे करीत आहेत.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…