क्राईम न्यूजठाणेमुंबई
Trending

Mira Bhayandar Crime News : दीड वर्षांपासून फरार असलेल्या खुनी आरोपीला अटक! वेशांतर करून जगत होता ‘हमालीचे’ जीवन

Mira Bhayandar Latest News : भाईंदरमधील क्रूर खुनाचा आरोपी ठाण्यातून जेरबंद; ओळख लपवण्यासाठी केस-दाढीही काढली

मीरा-भाईंदर :- दीड वर्षांपूर्वी भाईंदरमध्ये झालेल्या एका क्रूर खुनातील मुख्य आरोपीला गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-1, काशिमीरा पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या दीड वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा हा आरोपी आपला वेश बदलून आणि ओळख लपवून उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात हमालीचे काम करत असल्याचे समोर आले आहे. Mira Bhayandar Latest Crime News

काय आहे प्रकरण?

5 फेब्रुवारी 2024 रोजी भाईंदरमधील बी.पी. क्रॉस रोड येथील सार्वजनिक शौचालयाच्या गल्लीमध्ये रितेश राजेंद्र कावळे (वय 25) या तरुणाचा अमानुषपणे खून करण्यात आला होता. आरोपींनी त्याला नग्न करून, हात-पाय बांधून टॉमी बार, दांडके आणि चाकूने मारहाण करून त्याची हत्या केली होती. या प्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील मुख्य आरोपी रामू उर्फ रामकेश यादव हा तेव्हापासून फरार होता.

पोलिसांनी रचला सापळा

या गुन्ह्याचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-1, काशिमीराकडे सोपवण्यात आला होता. पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, आरोपी रामू यादव हा अंबरनाथ परिसरात आपला वेश बदलून वावरत आहे. रामूने आपली ओळख लपवण्यासाठी केस, दाढी आणि मिशा काढून टाकल्या होत्या. तसेच, कोणताही संपर्क साधनांचा वापर न करता तो अंबरनाथच्या खोनीगाव, पाईपलाईन रोड भागात हमालीचे काम करत होता.

पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, त्याने आपले नाव रामु उर्फ रामकेश दूधनाथ यादव (वय 27) असे सांगितले. पोलिसांनी कौशल्यपूर्ण पद्धतीने चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्यातील आपला सहभाग कबूल केला आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त निकेत कौशिक आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या टीमने यशस्वी केली आहे. दीड वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीच्या अटकेमुळे पोलिसांना एक मोठे यश मिळाले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0