Mira Bhayandar Digital Fraud News : वृद्ध व्यक्तीला फसवून उकळली मोठी रक्कम; आंतरराज्यीय तपासाचे यश
मीरा-भाईंदर: देशभरात ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली फसवणुकीचे प्रकार वाढत असताना, लखनऊ (उत्तर प्रदेश) येथील 74 वर्षीय वृद्ध व्यक्तीला याच पद्धतीने तब्बल 95 लाख रुपयांना लुबाडणाऱ्या दोन सख्ख्या भावांना मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्षाच्या मदतीने अटक करण्यात आली आहे. लखनऊ सायबर क्राईम पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे आंतरराज्यीय सायबर गुन्हेगारांवर वचक बसण्यास मदत झाली आहे. Mira Bhayandar Latest Crime News
लखनऊ येथील फिर्यादी बी. एन. सिंह यांना ‘डिजिटल अरेस्ट’ करून त्यांच्या वृद्धत्वाचा फायदा घेत ही मोठी आर्थिक फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी लखनऊ, उत्तर प्रदेश येथील सायबर क्राईम पोलीस ठाण्यात 8 एप्रिल 2025 रोजी भारतीय न्याय संहिता (BNS) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करत असलेले लखनऊ सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील कुमार सिंह यांनी आपल्या पथकासह मीरा-भाईंदर येथे धाव घेतली. त्यांनी मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे यांच्याकडे पोलीस मदतीची विनंती केली. त्यानुसार, डोईफोडे यांनी मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे प्रभारी अविराज कुराडे यांना आवश्यक ती मदत करण्याचे आदेश दिले.
मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्षातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने कारवाई करत, या गुन्ह्यातील आरोपी मोहम्मद इक्बाल बालासाहेब आणि शाईन इक्बाल बालासाहेब या दोघा भावांना 24 जुलै 2025 रोजी मीरारोड येथून ताब्यात घेतले. त्यानंतर, त्यांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी लखनऊ सायबर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, पोलीस उप-आयुक्त संदीप डोईफोडे आणि सहायक पोलीस आयुक्त मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. मध्यवर्ती गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे प्रभारी पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गांगुर्डे, दत्तात्रय सरक, पुष्पराज सुर्वे, पोलीस उपनिरीक्षक श्रीमंत जेथे यांच्यासह अनेक पोलीस अधिकारी आणि अंमलदार या मोहिमेत सहभागी होते.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…