मुंबई

Bhandup News : भांडूप खिंडीपाड्यात दरड कोसळली, अनेक घरे उद्ध्वस्त

दोन दिवसांच्या संततधार पावसानंतर दुर्घटना; सुदैवाने जीवितहानी टळली, अनेक कुटुंबे बेघर!

मुंबई :- मुंबईत गेले दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भांडूप पश्चिमेकडील खिंडीपाडा परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. सततच्या पावसामुळे मंगळवारी संध्याकाळी या परिसरातील साई निकेतन गृहनिर्माण संस्थेजवळ दरड कोसळली. या घटनेत चार घरे उद्ध्वस्त झाली, तर बुधवारी (आज) सकाळी 11.15 वाजता पुन्हा माती खचल्याने आणखी दोन रिकामी घरे कोसळली. सुदैवाने, या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत.

मुंबईतील निसरड्या डोंगर उतारावर वसलेल्या झोपड्यांमध्ये लाखो कुटुंबे जीव मुठीत घेऊन राहत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात या झोपड्यांवर दरड कोसळण्याचा धोका असतो. मुंबईत अशी सुमारे २०० धोकादायक ठिकाणे असून, यापैकी सर्वाधिक ठिकाणे पूर्व उपनगरांत आहेत, ज्यात भांडूप आणि घाटकोपरचा समावेश आहे. महापालिका दरवर्षी पावसाळ्यापूर्वी या झोपड्यांना जागा रिकाम्या करण्याच्या नोटिसा बजावते. मात्र, तरीही नागरिक वर्षानुवर्षे जीव धोक्यात घालून येथेच राहात आहेत.

मंगळवारी दरड कोसळण्याची घटना ओमेगा शाळेसमोर घडली, जिथे काही तासांच्या अंतराने दोन वेळा माती आणि घरांचे ढिगारे खाली आले. मुंबईतील डोंगर उतारावर सुमारे २० हजार झोपड्यांमध्ये साधारण लाखभर नागरिक वास्तव्यास आहेत. यातील बहुतांशी झोपड्या म्हाडा आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जमिनीवर असल्याने त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गुंतागुंतीचा बनला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0