Mira Bhayandar Crime News : वस्तुविक्रीचे ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवून ऑनलाईन गुंतवणुक करण्यास सांगुन फसवणूक
2 लाख 49 हजार 170 रूपये तक्रारदार यांना परत करण्यात उत्तन सागरी पोलीस स्टेशन यांना यश
मिरा भाईंदर :- आर्थिक आमिषाला बळी पडून एका तरुणाची फसवणूक होऊन पोलिसांनी त्यांचे पैसे परत मिळवून देण्यास यश आले. मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाचे आस्थापनेवरील उत्तन सागरी पोलीस ठाण्याच्या हडीमध्ये राहणारे कु. ब्रिडा बोनी ढोलु, (23 वर्षे), (रा. बाचा हाऊस जवळ, करईपाड़ा, उत्तन, भाईंदर प.,) या पार्टटाईम जॉबसाठी युटयुबवर व्हिडीओ सर्च करीत असतांना मोबाईल नंबरवरून मौरीन नावाचे व्यक्तीने व्हॉट्सॲपव्दारे मोबाईल नंबरवर http:/amazon9919.com अशी लिंक पाठवून त्याव्दारे ऑनलाईन वस्तु खरेदी करून त्यांचे विक्रीचे टास्क पूर्ण केले तर जास्त परतावा मिळेल असे प्रलोभन दाखवुन वेगवेगळ्या UPI ID वर पैसे भरण्यास भाग पाडले. त्यावरून त्यांनी पैसे पाठवून वेळोवेळी प्राप्त ऑनलाईन टास्क पूर्ण केले असताना देखील भरलेले पैसे तसेच त्याचे बदल्यातील पैसे असा काहीएक परतावा न देता त्यांची एकूण रूपये 2 लाख 49 हजार 170 एवढ्या रकमेची फसवणूक झाली होती. फसवणुकीच्या अनुषंगाने पोलीस ठाणे उत्तन सागरी येथे भा.दं.वि.सं. कलम 420,34 सह माहिती तंत्रज्ञान (सुधारणा) अधिनियम 2008 कलम 66 (सी), 66 (डी) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गुन्हयात एकापेक्षा जास्त पिडीत आहेत.
गुन्हयाचा तपास करीत असतांना आरोपींनी फिर्यादी पिडीत यांची रक्कम स्विकारण्यासाठी तसेच ती रक्कम वेगवेगळ्या बैंक अकाउंटमध्ये वळती करण्यासाठी वापर केलेले अनेक बैंक अकाउंट निष्पन्न झालेले होते. त्यामुळे तक्रारदार यांचे पैसे परत मिळविण्याकरिता सदरच्या बैंक अकाउंटमधील रक्कम गोठविण्यात आलेली होती. त्यानंतर न्यायालयाकडून तक्रारदार यांची रक्कम परत मिळविण्याकरिता उत्तन सागरी पोलीस ठाणेचे अधिकारी अंमलदार यांनी वेळोवेळी पाठपुरावा केल्याने तक्रारदार ब्रिंडा बोनी ढोलु यांची फसवणुक झालेली 2 लाख 49 हजार 170 ही 100 टक्के रक्कम त्यांच्या बैंक खात्यावर परत मिळविण्यात आलेली आहे.
पोलीस पथक
प्रकाश गायकवाड, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ 01 मिरारोड, दीपाली खन्ना, सहाय्यक पोलीस आयुक्त, भाईंदर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे उत्तन सागरीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, दादाराम करांडे, पोलीस निरीक्षक गुन्हे ऋषिकेश पवळ, पोलीस हवालदार राजाराम आसवले, पोलीस हवालदार दिलीप सनेर यांनी पार पाडली आहे.
पोलीसकडून नागरिकांना आवाहन
मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयामधील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, आपणांसोबत कोणत्याही प्रकारची ऑनलाईन फसवणूक झाल्यास आपण नजीकच्या पोलीस ठाणेस, सायबर पोलीस स्टेशन यांना संपर्क करावा, तसेच www.cybercrime.gov.in अथवा 1930 या हेल्पलाईनवर संपर्क साधुन तात्काळ आपली तक्रार नोंद करावी.