मीरा-भाईंदर मुंबई | ६ सप्टेंबर २०२५ तेलंगणा राज्यात मेफेड्रॉन (एमडी) या अंमली पदार्थाची निर्मिती व विक्री करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकत गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-४ च्या पथकाने कारखाना उध्वस्त केला. Mira Bhayandar Crime Branch Busted Drug Racket या कारवाईत पोलिसांनी ५ किलो ७९० ग्रॅम एमडी, हजारो लिटर रसायन, जवळपास एक टन पावडर तसेच साहित्य जप्त केले. Mira Bhayandar Latest Crime News
८ ऑगस्ट रोजी काशिमीरा बसस्टॉपजवळील अॅक्सिस बँक एटीएमसमोर पोलिसांनी फातिमा मुराद शेख उर्फ मोल्ला (वय २३) हिला अटक केली. तिच्याकडून १०५ ग्रॅम एमडी जप्त करण्यात आले. चौकशीत ती बांगलादेशी नागरिक असल्याचे उघड झाले. पुढील तपासात तिच्या टोळीत एकूण १० आरोपी सामील असल्याचे समोर आले. त्यांच्या ताब्यातून १७८ ग्रॅम एमडी आणि जवळपास २४ लाखांची रोकडही जप्त झाली.
तपास पुढे नेताना आरोपी तेलंगणातील चेरापल्ली, नवोदया कॉलनी येथील प्लॉटवर एमडी निर्मिती कारखाना चालवत असल्याचे निष्पन्न झाले. ५ सप्टेंबर रोजी छापा टाकला असता, आरोपी श्रीनिवास विजय वोलेटी आणि त्याचा साथीदार तानाजी पंढरीनाथ पटवारी कारखान्यात सापडले. तेथून पोलिसांनी ५.७९ किलो एमडी, ३५,५०० लिटर रसायन, ९५० किलो पावडर व इतर साहित्य जप्त केले.
आजपर्यंतच्या तपासात एकूण १२ आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ५.९६ किलो एमडी, २७ मोबाईल फोन, ३ चारचाकी वाहने, १ दुचाकी, इलेक्ट्रॉनिक वजन काटे व साहित्य जप्त करण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर आयुक्त दत्तात्रय शिंदे, उप आयुक्त (गुन्हे) संदीप डोईफोडे आणि सहायक आयुक्त (प्रकटीकरण) मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकाचे नेतृत्व पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी केले. या छाप्यात गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-४ मधील मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.
पुढील तपास सुरू
संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास गुन्हे प्रकटीकरण शाखा, कक्ष-४ करत आहे. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध कठोर पावले उचलली जातील.
Haider Ali Shaikh On Mumbai BMC School : TET नसलेल्या शिक्षकांच्या नियुक्तीवरून हैदर अली शेख…
Mumbai Money Laundering Case : सामान्य नागरिकांच्या कागदपत्रांचा आधार घेऊन उघडला 'फसवणुकीचा खजिना' | गुन्हे…
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…