क्राईम न्यूजमुंबई

Mira Bhayandar Tadipar News : मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील परिमंडळ-3 हद्दीतील 7 सराईत गुन्हेगार 1 व 2 वर्षासाठी तडीपार,पोलिसांची कामगिरी

Mira Bhayandar Tadipar News : तडीपारीची कारवाई सुरू झाल्याने सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये खळबळ माजली आहे.

विरार :- मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील परिमंडळ-3 पोलिसांनी गंभीर प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या ७7सराईत गुन्हेगारांना 1 व 2 वर्षासाठी तडीपार केले आहे. Mira Bhayandar Tadipar News तडीपारीची कारवाई सुरू झाल्याने सराईत व रेकॉर्डवरील गुन्हेगारांमध्ये खळबळ माजली आहे.

परिमंडळ-3 पोलीस ठाण्याच्या हद्दीत शरीराविरुद्ध व मालमत्तेच्या गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी आता पोलिसांनी कंबर कसली आहे. या सराईत आरोपींवर कायद्याचा जरब व धाक निर्माण होण्यासाठी आणि भविष्यात कुठलाही अनुचित प्रकार अथवा समाजविघातक घटना टाळण्यासाठी परिमंडळ तीनच्या पोलिस उपायुक्तांकडून पोलीस ठाण्यात वास्तव्यात असलेले व गुन्ह्यात सक्रिय, उपद्रवी, रेकॉर्डवरील गुन्हेगारांना शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्याची कारवाई सुरू केली आहे. आगामी असलेल्या सणावारांच्या काळात कोणतीही अप्रिय घटना न घडण्यासाठी पोलिस उपायुक्त जयवंत बजबळे यांनी गुन्हेगारांभोवती फास आवळण्यास सुरुवात केली आहे. आणखी काही गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई होण्याची दाट शक्यता आहे.

मनिष वसंत गायकवाड (वय 24),अक्षय चिंतामण जाधव (वय 31),ओम सावले सिंग (वय 21),विशाल रंगीला यादव (वय 20),मुजमील नूर मोहम्मद कुरेशी (वय 22),तौफिक रज्जाक जोगीया (वय 25),तारीक तलात शेख (वय 35) सर्व आरोपींना जवळपास चार जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0