Mir Bhayandar Police News : सायबर सेलच्या वतीने सायबर जनजागृती कार्यशाळा!

•मीरा-भाईंदर : महाराष्ट्र क्लास ऑनर्स असोसिएशन यांचेकडुन सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई :- मीरा-भाईंदर सायबर सेलच्या वतीने येथील मिरारोड-भाईंदर Maharashtra Class Owners Association- MCOA (Zone-Mira Bhayandar) यांना सायबर गुन्हे, स्वसंरक्षण प्रतिकारपर मार्गदर्शन आणि समुपदेशन कार्यशाळेचे राधाकृष्ण हॉल, पुनम सागर, मिरारोड येथे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पोलिस कामकाज कसे चालते याची माहिती देण्यात आली.



यानंतर रस्ता सुरक्षा, गुन्हे प्रतिबंध, लहान मुले व महिलांवर होणारे अत्याचार, पोलिस कायदे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी प्रकाश गायकवाड (परीमंडळ-1), सहायक पोलीस आयुक्त (नवघर विभाग),विवेक मुगळीकर व इतर मान्यवर उपस्थित होते. सायबर विषयक जनजागृतीबाबत पोलीस उप निरीक्षक प्रसाद शेनोळकर (सायबर पोलीस ठाणे) यांनी कार्यक्रमाकरीता उपस्थित असलेल्या 20 ते 60 वयोगटातील शिक्षकेत्तर कुंद व इतर नागरीकांना सविस्तर माहिती देवून मार्गदर्शन केले. ऑनलाइन फसवणूक, सोशल मीडिया या संदर्भात फेसबुक, व्हॉटसॲप, इंस्टाग्राम, टिकटॉक या ॲप्लिकेशनचा वापर करताना काय खबरदारी घ्यावी याबाबत मार्गदर्शन देण्यात आले आहे.
यावेळी 20 ते 60 वयोगटातील एकूण 100 शिक्षकेत्तर वृंद हजर होते. तसेच कार्यक्रमामध्ये उपस्थित शिक्षक व नागरीकांना दैनंदिन जिवनात इंटरनेटच्या माध्यामातुन होणारे आर्थिक व्यवहार व सोशल मिडीया संदर्भात आपण कसे सुरक्षित राहावे याबाबत महत्त्वपूर्ण अश्या सुचना देण्यात आल्यात. सायबर गुन्हे जनजागूतीबाचत पत्रक चाटप करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित श्रोत्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला, तसेच कार्यक्रमाबाबत सकारात्मक प्रतिक्रीया दिलेल्या आहेत.