मुंबई
Trending

Ministry Fake Document Scam: मंत्रालयात बनावट कागदपत्र स्कॅम उघड, उपसचिव किशोर भालेराव दोषी

गॅंगस्टर छोटा शकील यांच्याशी संबंधित खटल्यात बनावट कागदपत्राचा वापर

मुंबई :– तात्कालीन मुख्यमंत्री मंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांचे खाजगी सचिव यांच्या नावाने बनावट ईमेल प्रकरण तसेच मुख्यमंत्री यांच्या नावाचा गैरवापर करून बदली संदर्भातली अनेक घटना समोर येत असताना, मंत्रालयातून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आला आहे. मंत्रालयात बनावट कागदपत्रांचा महत्त्वाचा स्कॅम उघड झाला आहे. या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून यात मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा समावेश असल्याचा देखील समोर आले आहे. या संदर्भात अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास सुरू आहे. Ministry Fake Document Scam

सदरील प्रकार समोर आल्यानंतर या प्रकरणाची उच्चस्तरीय गोपनीय चौकशी करण्यात आली आहे. या चौकशीमध्ये तात्कालीन उपसचिव किशोर भालेराव हे स्वतः दोषी आढळून आले आहेत. त्यांच्याबरोबरच विशेष सरकारी वकील शेखर जगताप, श्यामसुंदर आणि शरद अग्रवाल हे देखील दोषी आढळले आहेत. त्यांचादेखील आरोपींमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. अनेक संबंधित गुन्ह्यात विशेष सरकारी वकील म्हणून बनावट कागदपत्रांच्या आधारे वकिलांची नियुक्ती केल्याची माहिती यामध्ये समोर आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. Ministry Fake Document Scam

गँगस्टर छोटा शकील Gangster Choota Shakil याच्याशी संबंधित खटल्यात देखील बनावट कागदपत्रांचा वापर कोणत्याही प्रकारची सक्षम आणि कायदेशीर मान्यता न घेता भालेराव यांनी बनावट आदेश पत्र जारी केल्याचे या चौकशी अहवालामध्ये समोर आले आहे. त्यामुळे गृह मंत्रालयाने किशोर भालेराव यांना निलंबित केले आहे. इतकेच नाही तर गँगस्टर छोटा शकील याच्याशी संबंधित खटल्यात देखील ही बनावट कागदपत्र वापरण्यात आल्याचे अहवालात समोर आले आहे. विशेष म्हणजे ही कागदपत्र बार कौन्सिल कडे देखील सादर करण्यात आली आहे. या संदर्भात संजय पुनामिया यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांच्या तक्रार नंतर सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Ministry Fake Document Scam

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0