Categories: Uncategorized

Mhada Home Price : मुंबईकरांसाठी खुशखबर! म्हाडाची घरे 10 ते 15 लाख रुपयांनी स्वस्त होतील, अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली

Mhada Home Price News : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना खूशखबर दिली आहे. म्हाडाची घरे 10 ते 15 लाख रुपयांनी स्वस्त होणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्र्यांनी केली आहे.

मुंबई :- मुंबईत घर घेणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. पण, सध्या म्हाडाच्या घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. म्हाडाच्या लॉटरीत घराच्या किंमती अशाच राहिल्या तर सर्वसामान्यांचे घर घेण्याचे स्वप्न कसे पूर्ण होणार? अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांना मोठा दिलासा दिला आहे.

मुंबईतील म्हाडाच्या घरांच्या Mhada Home Price किमती 10 ते 25 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. 62 लाख रुपयांचे घर 50 लाख रुपयांना आणि 39 लाख रुपयांचे घर 29 लाख रुपयांना मिळणार आहे. तसेच गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी खाजगी विकासकांनी बांधलेल्या 370 घरांच्या किंमती कमी करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी करण्याची घोषणा केली आहे.

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, सध्याच्या मुंबई लॉटरीसाठी जाहीर करण्यात आलेल्या किंमतींमधून म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी झाल्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे, असे ट्विट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

मुंबईत घरांसाठी म्हाडाची लॉटरी जाहीर झाली आणि स्वतःचे घर असावे असे स्वप्न पाहणाऱ्या लोकांनी घर खरेदीसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली. मात्र ज्यांनी घरांसाठी अर्ज दाखल केले आहेत. त्यांना आता ड्रॉची उत्सुकता लागली आहे. त्यामुळे आता अर्जदारांना सोडतीसाठी आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाने घरांसाठी नोंदणी आणि अर्ज करण्यासाठी 15 दिवसांची मुदतवाढ दिली आहे.

इच्छुकांना आता 19 सप्टेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करता येईल. अर्ज आणि ठेव मुदतवाढीच्या आत सबमिट करणे आवश्यक आहे. म्हाडाच्या सोडतीची यापूर्वी 13 सप्टेंबर ही तारीख होती, मात्र अर्ज सादर करण्याची वेळ वाढल्याने तीही लांबणीवर पडली असून, लवकरच त्याची नवी तारीख जाहीर होणार आहे.

vivek

Share
Published by
vivek

Recent Posts

Rohit Pawar : रोहित पवारांना ‘सीएकओ’चा फोन! विमान अपघाताच्या वादात स्मारकाची चर्चा; बारामती पोलीस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी

•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…

7 hours ago