मुंबईठाणे
Trending

Chembur Accident : चेंबूरमध्ये संरक्षण भिंत कोसळली; मोठी दुर्घटना टळली

Chembur Wall Accident News : चेंबूर वाशीनाका येथे डोंगरावरील संरक्षक भिंत झोपड्यांवर कोसळली; सुदैवाने जीवितहानी नाही

मुंबई :- मुंबईसह उपनगरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दुर्घटनांचे प्रमाण वाढले आहे. अशाच एका घटनेत, चेंबूर परिसरातील वाशीनाका येथील अशोक नगरमध्ये रविवारी सायंकाळी एका डोंगरावरील संरक्षण भिंत अचानक खाली असलेल्या झोपड्यांवर कोसळली. ही भिंत एमएमआरडीएने बांधली होती. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही, मात्र सात झोपड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने, स्थानिक नागरिकांच्या ही बाब त्वरित लक्षात आल्याने त्यांनी तातडीने घराबाहेर धाव घेतली. यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि मोठी दुर्घटना टळली.

पावसामुळे दुर्घटना

सततच्या पावसामुळे ही संरक्षण भिंत कमकुवत झाली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने मदतकार्य सुरू केले असून, बाधित कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. मुंबईतील पावसाचा जोर असाच राहिल्यास अशा आणखी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने, धोकादायक ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
google.com, pub-8293389722763664, DIRECT, f08c47fec0942fa0