Navi Mumbai Police Latest News : राज्यातील कायद्यातील नवीन दुरुस्तीनंतर कठोर कारवाई; शहर ‘नशामुक्त’ करण्याचे पोलिसांचे उद्दिष्ट
नवी मुंबई :- अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘मकोका’ (MCOCA) कायद्यात नुकतीच दुरुस्ती केली आहे. या दुरुस्तीनंतर नवी मुंबई पोलिसांनी पहिल्यांदाच या कायद्याचा वापर करून एका टोळीला बेड्या ठोकल्या आहेत. या कारवाईत सहा आरोपींना अटक करून 75 लाख रुपयांचे मेफेड्रॉन जप्त करण्यात आले आहे.Navi Mumbai Police Latest News
पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या आदेशानुसार आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. अंमली पदार्थ विरोधी कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, 11 जुलै 2025 रोजी दिघा येथील ओमकार अपार्टमेंटमध्ये छापा टाकण्यात आला.
या छाप्यात पोलिसांनी टोळीची म्होरक्या शांताबाई किसन करंडेकरसह एकूण सहा आरोपींना ताब्यात घेतले. तिच्या इतर साथीदारांमध्ये उषा रोशन नाईक, शैलश बसन्ना नाईक, ज्योती निलेश नाईक, निलेश बसन्ना नाईक आणि रोशन बसन्ना नाईक यांचा समावेश आहे. त्यांच्याकडून व्यावसायिक मात्रेतील 252.3 ग्रॅम वजनाचा मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.
गुन्हेगारी टोळीचे वर्चस्व
या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांनी धक्कादायक माहिती उघड केली. टोळीप्रमुख शांताबाई करंडेकर ही गेल्या अनेक वर्षांपासून आर्थिक फायद्यासाठी अंमली पदार्थांची विक्री करत होती. तसेच, नवी मुंबईतील रबाळे आणि आजूबाजूच्या परिसरात तिने आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी खून, खुनाचा प्रयत्न आणि मारामारीसारखे गंभीर गुन्हे केले होते. तिच्या दहशतीमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते.
या गंभीर गुन्ह्यांची नोंद घेत पोलिसांनी, गुन्हेगारी प्रवृत्ती आणि अंमली पदार्थांच्या तस्करांवर नियंत्रण मिळवण्यासाठी त्यांच्यावर ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाई केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस आयुक्त राहुल घस हे करत आहेत.
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…
Mumbai Budget 2026 : कोस्टल रोड आणि पुलांच्या जाळ्यासाठी हजारो कोटींची तरतूद | मुंबईच्या विकासासाठी…
Mumbai Budget 2026 : प्रकल्पांची गती वाढवण्यासाठी राखीव निधीचा आधार | गेल्या वर्षीच्या तुलनेत 8.77…