Mumbai Police Latest News : झोनल DCP पासून सायबर गुन्हे व अंमली पदार्थ विरोधी पथकात मोठे फेरबदल
मुंबई :- मुंबईसारख्या अत्यंत संवेदनशील आणि गतिमान शहरात कायदा व सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलिस दलामध्ये सातत्याने पुनर्रचना होत असते. याच पार्श्वभूमीवर मुंबई पोलिस दलात एका मोठ्या निर्णयाच्या अनुषंगाने 13 पोलीस उपआयुक्तांच्या (DCP) बदल्यांची घोषणा करण्यात आली आहे.यामध्ये झोनल परिमंडळांपासून ते विशेष शाखा, सायबर गुन्हे, वाहतूक आणि अंमली पदार्थ विरोधी पथक अशा विविध महत्वाच्या विभागांचा समावेश आहे. Mumbai Police Latest News
मुंबई पोलिस दलातील मोठ्या खांदेपालटीत एकूण 13 पोलीस उपआयुक्तांची (DCP) पदस्थापना करण्यात आली आहे.
1.कृष्ण कांत उपाध्याय यांची बदली मुख्यालय-1 येथून परिमंडळ-3 मध्ये करण्यात आली आहे.
2.दत्ता किसन नलावडे यांना प्रकटीकरण, गुन्हे शाखेतून परिमंडळ-10 मध्ये नियुक्त करण्यात आले आहे.
3.महेश धर्माजी चिमटे यांची बदली संरक्षण विभागातून परिमंडळ-12 मध्ये झाली आहे.
4.नवनाथ ढवळे यांना परिमंडळ-6 वरून अंमली पदार्थ विरोधी पथकात नियुक्त करण्यात आले आहे.
5.विजयकांत मंगेश सागर यांची बदली परिमंडळ-7 वरून बंदर परिमंडळात करण्यात आली आहे.
6.प्रशांत अशोकसिंग परदेशी यांना मंत्रालय सुरक्षा येथून वाहतूक (दक्षिण) विभागात नियुक्त करण्यात आले आहे.
7.निमित गोयल यांची बदली सशस्त्र पोलीस, कलिना येथून विशेष कृती दल (आ.गु.वि.) मध्ये करण्यात आली आहे.
8.दत्तात्रय कांबळे यांना परिमंडळ-3 वरून विशेष शाखा-1मध्ये पाठवण्यात आले आहे.
9.पुरुषोत्तम नारायण कऱ्हाड यांची बदली विशेष शाखा-1 येथून सायबर गुन्हे शाखेत करण्यात आली आहे.
10.सचिन बी. गुंजाळ यांना परिमंडळ-10 येथूनप्रतिबंधक गुन्हे शाखा येथे पाठवण्यात आले आहे.
11.समीर अस्लम शेख यांची बदली पोलीस अधीक्षक, सातारा येथून परिमंडळ-6 मध्ये झाली आहे.
12.राकेश ओला यांना पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर येथून परिमंडळ-7 मध्ये नियुक्त करण्यात आले आहे.
Mumbai Police Latest News : पोलीस दलाच्या आधुनिकीकरणावर राज्य सरकारचा भर | कौशल्य विकास मंत्री…
Maharashtra Political Latest News : वरळीच्या अधिवेशनात होणार मोठी घोषणा | पार्थ पवार यांना राज्यसभेची…
Eknath Shinde On VSR COMPANY : पक्षाचे मंत्री, नेते आणि आमदार आता 'व्हीएसआर'ने प्रवास करणार…
PM Modi Latest News : जागतिक राजकारणात नवा विक्रम | 10 कोटी फॉलोअर्स असणारे पहिले…
•मुंबईत एफआयआर नाकारल्यानंतर लढा आता बारामतीत | 'देवगिरी'वर स्मारकासाठी अर्थसंकल्पात तरतुदीचे संकेत | रोहित पवारांसोबत…
Yugendra Pawar On Ajit Pawar Accident : पवार कुटुंबातील दोन्ही पुतणे आता तपासासाठी मैदानात |…